"एक मराठा लाख मराठा" सिनेमाचा गजर २४ नोव्हेंबर पासून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 03:32 PM2017-11-23T15:32:56+5:302017-11-23T21:02:56+5:30

मराठा क्रांती मूक मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्र ज्याप्रकारे ढवळून काढला होता, तसाच प्रचार साताऱ्याच्या गणेश शिंदे यांच्या एक मराठा लाख ...

"A Maratha lakh maratha" alarm from November 24 | "एक मराठा लाख मराठा" सिनेमाचा गजर २४ नोव्हेंबर पासून

"एक मराठा लाख मराठा" सिनेमाचा गजर २४ नोव्हेंबर पासून

ाठा क्रांती मूक मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्र ज्याप्रकारे ढवळून काढला होता, तसाच प्रचार साताऱ्याच्या गणेश शिंदे यांच्या एक मराठा लाख मराठा सिनेमाचा होतो आहे. निर्माता, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता अशा तिहेरी भूमिका गणेशने या सिनेमातून साकारल्या आहेत. लहानपणापासूनच सिनेमाचे वेड असलेल्या गणेशने यापूर्वी अनेक मराठी सिनेमांचे वितरण देखील केले होते, त्यामुळे प्रेक्षकांना नेमके काय आवडते, सिनेमा त्यांच्यापर्यंत कसा पोहचला पाहिजे हे सर्व त्याला चांगले माहित असल्याने २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा एक मराठा लाख मराठा सर्वांना परिचित आहे.

एक मराठा लाख मराठा सिनेमा म्हणजे मराठी माणसाची व्यथा आहे.शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या तरुणाची ही गोष्ट आहे. आपल्या बहिणीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा त्याचा हा संघर्ष या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. सिनेमात मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मनोज जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, नफिसा शेख, उषा नाईक,भक्ती चव्हाण इ बड्या कलाकारांसोबत आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुचे आई –बाबा देखील सिनेमात आहेत.शांताबाई या गाण्याने वेड लावणारी राधिका पाटील देखील याच सिनेमातून पदार्पण करते आहे. यासोबत कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले देखील या सिनेमात दिसणार आहेत.सिनेमाला संजय साळुंखे आणि अतुल लोहार यांचे संगीत लाभले आहे.

काही दिवसांपूर्वी आलेल्या शांताबाई गाण्याने फक्त मराठीच नाही तर इतर भाषिकांना देखील वेड लागले होते. लग्नाच्या वरातीपासून टीव्हीच्या शोजपर्यंत शांताबाई  गाण्याने सगळीकडे धम्माल उडवून दिली होती. हीच शांताबाई गर्ल म्हणजे राधिका पाटील या एका  गाण्याने प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या सोशल मिडीयावर तर चाहत्यांचा अक्षरशः पाउस पडला. आता हीच शांताबाई गर्ल पहिल्यांदाच मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा पहिला सिनेमा एक मराठा लाख मराठा आहे, राधिका, आपल्या भूमिकेबद्दल सांगते कि, एकतर पहिल्यांदाच मी अभिनय करत होती, त्यात माझी भूमिका एका ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब घरातील मुलीची होती. मी गोरी असल्याने मला सावळी करण्यात आली. सिनेमातील नायकाच्या बहिणीची माझी भूमिका आहे. जिच्यावर अतिप्रसंग घडतो. हा सीन करतांना मला खरोखर जाणीव झाली की ज्या महिलांवर असा अत्याचार होतो त्यांच्यावर काय परिणाम होत असेल. रुपेरी पडद्यावर माझा अभिनय रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतो का याकडेच माझे लक्ष लागले असल्याचे राधिकाने म्हटले आहे.

Web Title: "A Maratha lakh maratha" alarm from November 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.