मराठमोळया सनीचा गोल्डन ग्लोबमध्ये जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 05:48 PM2017-01-10T17:48:41+5:302017-01-10T17:48:41+5:30

भारतीय वंशाचा ब्रिटीश अभिनेता देव पटेल आणि आठ वर्षाचा बाल कलाकार सनी पवार यांनी 'लायन' चित्रपटाची ओळख ७४ व्या ...

Marathamoya Sunny's flaws in Golden Globe | मराठमोळया सनीचा गोल्डन ग्लोबमध्ये जलवा

मराठमोळया सनीचा गोल्डन ग्लोबमध्ये जलवा

googlenewsNext
रतीय वंशाचा ब्रिटीश अभिनेता देव पटेल आणि आठ वर्षाचा बाल कलाकार सनी पवार यांनी 'लायन' चित्रपटाची ओळख ७४ व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळ्यात प्रेक्षकांना करुन दिली. काळ्या रंगाच्या कपड्यात आलेल्या दोघांचेही प्रेक्षकांनी उत्सफुर्त स्वागत केले.

देव पटेलने 'लायन' चित्रपटाची थोडक्यात ओळख करुन दिली. यावेळी छोट्या सनी पवारला त्याने उचलून घेताच प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा गजर करीत त्याला जोरदार प्रतिसाद दिला. सनीने 'लायन' हा आमचा सिनेमा आहे, असे म्हणताच टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट झाला.

गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी 'लायन' हा चित्रपट बेस्ट मोशन पिक्चर्स - ड्रामा, बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर या कॅटॅगरीसाठी निवडण्यात आला आहे.

सनी पवारने यात लहानपणीच्या सरुची व्यक्तीरेखा साकारली आहे.

सनी पवारची निवड ८००० मुलांच्या ऑडिशनमधून झाली होती.

'लायन' चित्रपटात रॉनी मारा आणि ब्रिटीश अभिनेता देव पटेल यांच्या भूमिका आहेत. भारतीय अभिनेत्री दिप्ती नवल, तनिष्ठा चटर्जी, प्रियंका बोस आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या यात भूमिका आहेत.

आपल्या भावासह रेल्वे स्टेशनवर पोहोचलेला पाच वर्षाचा गरीब सरू हा मुलगा चुकून रेल्वेमध्ये झोपतो आणि गाडी सुटते. जाग येते तेव्हा तो खूप लांब पोहोचलेला असतो. अशा तऱ्हेने तो कोलकात्याला पोहोचतो. त्याचा भाऊ शोध घेतो पण सापडणे अशक्य. कोलकात्याच्या रस्त्यावर पाच वर्षाचा सरू भटकत असतो. जगण्यासाठी खूप संघर्ष त्याला करावा लागतो. त्यानंतर एक ऑस्ट्रेलियन कुटुंब त्याला दत्तक घेते. २५ वर्षानंतर तो आपल्या हरवलेल्या कुटुंबियांचा शोध घ्यायला सुरूवात करतो अशी या चित्रपटाची कथा आहे.

गार्थ डेव्हीस यांनी 'लायन'चे दिग्दर्शन केले आहे.

'लायन' हा चित्रपट २४ फेब्रुवारी २०१७ रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटींग भारतात आणि ऑस्ट्रेलियात करण्यात आले आहे.

Web Title: Marathamoya Sunny's flaws in Golden Globe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.