"एक दिवस देवेंद्रजी आपल्या देशाचे पहिले मराठी पंतप्रधान", मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:52 IST2024-12-06T13:52:11+5:302024-12-06T13:52:28+5:30

मराठी अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.

Marathi Actor Abhijeet Kelkar Shared Post For Maharashtra New Cm Devendra Fadnavis Says One Day He Will Be The First Marathi Prime Minister Of Our Country | "एक दिवस देवेंद्रजी आपल्या देशाचे पहिले मराठी पंतप्रधान", मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल!

"एक दिवस देवेंद्रजी आपल्या देशाचे पहिले मराठी पंतप्रधान", मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने (Mahayuti) अखेरीस राज्यात सत्ता स्थापन केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (०५ डिसेंबर २०२४ ) मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  देवेंद्र फडणवीस यांच्यासह  अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत. यातच आता एका मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत आहे. 

मराठी अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. फक्त एवढंच नाही तर येत्या काळात देवेंद्र फडणवीस हे देशाचे "पहिले मराठी पंतप्रधान" होतील, असेही भाकीत त्यानं केलं आहे.  मराठी अभिनेता अभिजित केळकर याने फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहलं, "...आजच माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतो...एक दिवस असाही येईल ज्या दिवशी, देवेंद्रजी आपल्या देशाचे "पहिले मराठी पंतप्रधान" होतील... तथास्तु!!! ... मनापासून अभिनंदन आणि अनेक अनेक शुभेच्छा Devendra Fadnavis जी". या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय. 

अभिजीत केळकरच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास सध्या तो झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेमध्ये काम करत आहे. अभिजीत हा समजातील घटनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसून येतो.  समाजातील गंभीर मुद्द्यांवर अगदी निर्भिडपणे तो त्याच मत 
 मांडतो.

दरम्यान, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जवळपास 20 हजारांचं मताधिक्य राखत ते निवडूण आले आहेत. काँग्रेस पक्षाच्या प्रफुल्ल गुदधे यांचा पराभव करत देवेंद्र फडणवीस 62 हजार 947 मतं मिळवत विजयी झाले आहेत. देवेंद्र यांनी निवडणुकीत विजयी झाले होते, तेव्हा अभिनेत्यानं शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती. 

Web Title: Marathi Actor Abhijeet Kelkar Shared Post For Maharashtra New Cm Devendra Fadnavis Says One Day He Will Be The First Marathi Prime Minister Of Our Country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.