आईबाबांची केदारनाथ वारी चुकली, अभिनेत्याने घरीच घडवलं दर्शन; गणपती देखावा ठरतोय चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 17:48 IST2023-09-20T17:46:08+5:302023-09-20T17:48:39+5:30
मराठी आणि बॉलिवू़ड सेलिब्रिटींनीही मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन केलं. सेलिब्रिटींनी लाडक्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आईबाबांची केदारनाथ वारी चुकली, अभिनेत्याने घरीच घडवलं दर्शन; गणपती देखावा ठरतोय चर्चेचा विषय
सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. मराठी आणि बॉलिवू़ड सेलिब्रिटींनीही मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन केलं. सेलिब्रिटींनी लाडक्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मराठी अभिनेताअमेय वाघच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. अमेयने सोशल मीडियावर घरच्या बाप्पाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अमेयच्या घरातील बाप्पासाठी साकारण्यात आलेला देखावाही खास आहे. शंकारच्या पिंडीचा देखावा अमेयच्या घरी साकारण्यात आला. अमेयबरोबरच त्याच्या आईवडिलांसाठी हा देखावा खास आहे. अमेयने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत देखाव्याची झलक दाखवली आहे. या व्हिडिओला त्याने "माझ्या आई बाबांना काही कारणामुळे “केदारनाथ” ला जाता आलं नाही म्हणून आमच्या महेश काकांनी तोच देखावा घरी तयार केला! आता गणपती थाटामाटात बसले आहेत! गणपती बाप्पा मोरया", असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? 'तो' फोटो व्हायरल
अमेयने अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून अमेयला लोकप्रियता मिळाली. त्याने 'मुरांबा', 'झोंबिवली', 'धुरळा', 'गर्लफ्रेंड', 'अनन्या', 'जग्गू आणि ज्युलिएट' या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.