AshokSaraf : -अन् अशोक सराफ, निवेदितांनी आपल्या तान्ह्या लेकाला बिस्किट पाण्यात बुडवून खाऊ घातलं, काय होता तो प्रसंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 08:00 IST2023-03-13T08:00:00+5:302023-03-13T08:00:02+5:30
Ashok Saraf, Nivedita Saraf : आयुष्यातले काही प्रसंग खूप काही शिकवून जातात. असंच काही घडलं होतं ते अशोक सराफ यांच्याबद्दल. होय, एका प्रवासातला एक प्रसंग त्यांना आयुष्यभराचा धडा देणारा ठरला.

AshokSaraf : -अन् अशोक सराफ, निवेदितांनी आपल्या तान्ह्या लेकाला बिस्किट पाण्यात बुडवून खाऊ घातलं, काय होता तो प्रसंग?
आयुष्यातले काही प्रसंग खूप काही शिकवून जातात. असंच काही घडलं होतं ते अशोक सराफ (, Nivedita Saraf) आयुष्यातले काही प्रसंग खूप काही शिकवून जातात. असंच काही घडलं होतं ते अशोक सराफ यांच्याबद्दल. होय, एका प्रवासातला एक ) यांच्याबद्दल. होय, एका प्रवासातला एक प्रसंग त्यांना आयुष्यभराचा धडा देणारा ठरला. आयुष्यात पैसा सर्व काही नसतो, हे त्या प्रसंगानं त्यांना शिकवलं. काय होता तो प्रसंग...? अशोक सराफ यांनी त्यांच्या बहुरूपी या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. अशोक सराफ व त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांच्या आयुष्यातील हा भावुक प्रसंग तुम्हालाही भावुक केल्याशिवाय राहणार नाही.
काय होता तो प्रसंग...?
तर अशोक सराफ व निवेदिता सराफ आपल्या एकुलत्या एका लेकाला म्हणजेच अनिकेत घेऊन कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले होते. अनिकेत तेव्हा अगदी तान्हुला होता. कोल्हापुरात दर्शन झालं आणि सराफ कुटुंब मुंबईला परतण्यासाठी निघालं. रेल्वेचा प्रवास होता. तान्हं बाळ सोबत आहे म्हणून बाळासाठी लागणारं सगळं साहित्य निवेदिता व अशोक सराफ यांनी प्रवासात सोबत घेतलं होतं. पण काहीक्षण कसोटीचे असतात. परतीच्या प्रवासात तान्ह्या अनिकेतला भूक लागली. दूध सोबत घेतलं होतं, मात्र प्रवासात ते नासलं होतं. अनिकेत भुकेनं व्याकुळ झाला. जोरजोरात रडू लागला. भुकेनं रडत असलेल्या मुलाला पाहून अखेर अशोक सराफ दूध मिळतं का पाहण्यासाठी ट्रेलखाली उतरले. ट्रेन सुटणार तर नाही, अशी भीती होती. पण तरिही ते 5 ट्रॅक ओलांडून स्टेशनबाहेर रस्त्यावर गेले. रस्त्यावर अनेक दुकानात दूध मिळतं का याची चौकशी केली. पण कुठेच दूध मिळालं नाही. अशोक सराफ निराश होऊन ट्रेनमध्ये परतले. लेकाचं रडणं सुरूच होतं. अखेर निवेदिता यांनी पाण्यात बुडवून ग्लुकोज बिस्किट त्याला खाऊ घातलं. तो क्षण अशोक सराफ कधीही विसरू शकले नाही. खिशात ४० रूपये असूनही ते आपल्या तान्ह्या लेकाला दूध पाजू शकले नाहीत. पैसा आयुष्यात सर्व काही नसतो, हे त्या घटनेनं त्यांना शिकवलं.
काय करतो अशोक व निवेदिता यांचा मुलगा
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना अनिकेत नावाचा एकुलता एक मुलगा आहे. अनिकेत सराफने आईवडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता वेगळी वाट चोखाळली. आज त्याने एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अनिकेत एक शेफ आहे. त्याला जेवण बनवण्यात रस आहे. बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्यालादेखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. म्हणून त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचं ठरवलं. फ्रान्समध्ये त्याचं शिक्षण झालं. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर 'निक सराफ' या नावाचं त्याचं युट्यूब चॅनलही आहे.