मराठी सिनेसृष्टीचा सर्वाधिक फिट अभिनेत्यालाही कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 10:24 AM2021-04-22T10:24:40+5:302021-04-22T10:25:15+5:30

आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी विनंती त्यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे. कृपया घरात राहा, मास्क घाला आणि स्वतःला संसर्ग होण्यापासून वाचवा असेही सध्या सारेच सेलिब्रेटी आवाहन करताये

marathi actor ashok shinde tested covid positive | मराठी सिनेसृष्टीचा सर्वाधिक फिट अभिनेत्यालाही कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

मराठी सिनेसृष्टीचा सर्वाधिक फिट अभिनेत्यालाही कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

googlenewsNext

कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत आहे. इंजेक्शन, बेड्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशात दिवसेंदिवस कोरोना रुग्नांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकर कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. योग्य पद्धतीने काळजी घेत असले तरीही कोरोना होत असल्याने सध्या अधिक चिंता वाढली आहे. बॉलिवूडप्रमाणेच आता मराठी कलाकारांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे.

Posted by Aashok Shinde on Tuesday, 20 April 2021

 

मराठी अभिनेते अशोक शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मराठी इंडस्ट्रीत सर्वाधिक फिट अभिनेता म्हणून ओळख असलेले अशोक शिंदे यांना कोरोनाी लागण झाल्याचे त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

 

क्वारंटाइन केले असून सर्व औषधोपचार सुरू आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी विनंती त्यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे. कृपया घरात राहा, मास्क घाला आणि स्वतःला संसर्ग होण्यापासून वाचवा असेही सध्या सारेच सेलिब्रेटी आवाहन करतायेत. 


लॉकडाऊनमध्येही गली क्रिकेटचा आनंद, बेजबाबदार तरुणांवर संतापली मराठमोळी अभिनेत्री

मात्र अजूनही काही लोकांना याची समज आलेली दिसत नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच हेमांगी कवीनेदेखील कोरोना काळात किती बेजाबदारपणे काही लोक वागत असल्याचे सांगितले होते. गल्तीत आणि मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्यांचे फोटो फेसबुकवरुन शेअर करत बेजबादार युवकांना टोला लगावला आहे. यांसारख्यांना 15 वर्षे जरी लॉकडाऊन लावला तरी काही फरक पडणार नाही, असेही तिने म्हटलंय.

आयपीएलपेक्षा ही जास्त पैसा इथे लागलेला आहे.रस्त्यावर यायच्या आधी 14 दिवस यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. दर ७२ तासांनी या सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येते.दर 1 तासाने बॅट आणि बॉल सॅनिटाईज करण्यात येत आहेत. मास्क न लावता खेळण्याची परवानगी काढण्यात आलेली आहे ( मास्क घालून कसं खेळणार, रन्स कमी नाही का होणार,वेडीच आहे मी).

Web Title: marathi actor ashok shinde tested covid positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.