... अन् अतुल परचुरे 'व्यक्ती आणि वल्ली'मध्ये पु. ल. देशपांडे बनले! वाचा हा अनोखा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 09:41 PM2024-10-14T21:41:28+5:302024-10-14T21:42:05+5:30
पु.ल. देशपांडेंनी अतुल परचुरेंना व्यक्ती आणि वल्ली नाटक कसं दिलं याचा खास किस्सा वाचा (atul parchure)
अतुल परचुरेंचं आज वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं. अतुल परचुरेंचं दीर्घ आजाराने निधन झालं. अतुल यांना काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. परंतु कॅन्सरवर त्यांनी यशस्वी मात केली. नुकतेच अतुल परचुरे सूर्याची पिल्ले नाटकात काम करणार होते. परंतु प्रकृती बरी नसल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलं होतं. अतुल परचुरे यांच्या कारकीर्दीतली गाजलेली भूमिका म्हणजे त्यांनी साकारलेली पु.ल.देशपांडे. व्यक्ती आणि वल्ली नाटक अतुल परचुरेंना कसं मिळालं याचा किस्सा वाचा.
असं मिळालं अतुल परचुरेंना व्यक्ती आणि वल्ली नाटक
अतुल परचुरे यांनी हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, "मी पु.लं.चा फॅन, चाहता. मला पु.लं.चं व्यक्ती आणि वल्ली पुस्तक पूर्ण पाठ. मी माझ्या वेगवेगळ्या नाटकात मग्न होतो. त्या काळात व्यक्ती आणि वल्ली रंगमंचावर आणण्याची चर्चा चालू होती. मला वाटलं त्यातल्या पु.लं.च्या भूमिकेसाठी विक्रम गोखले किंवा दिलीप प्रभावळकर यांच्यापैकी कोणाला तरी हा रोल मिळणार, मला या नाटकात रोल मिळेल असा मी विचारही केला नव्हता. आणि मला निर्मात्याचा फोन आला तू व्यक्ती आणि वल्लीमधील पु.लं. रोल करशील का?"
अतुल पुढे म्हणाले, "माझी पर्सनॅलिटी किंवा माझं बाह्य व्यक्तिमत्व तरुणपणच्या पु.लं. सारखं काहीसं तेव्हा होतं. मल विचारण्यापूर्वीच निर्मात्याने पु.लं. नाच विचारलं होतं की अतूल परचुऱ्यांना ही भूमिका द्यायची का? पु.ल. लगेच 'हो' म्हणाले. त्यामुळे मी ही भूमिका करायला नकार देणं शक्यच नव्हतं. माझी पु.लं. शी ओळख नव्हती. आणि त्या काळात त्यांच्या आजारपणाला सुरुवात झाली होती. पण त्यांच्या विनोदबुद्धी तशीच तीव्र होती." अशाप्रकारे अतुल परचुरेंना ही भूमिका मिळाली. अतुल यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जातेय.