"नाटकाच्या मध्यंतरात त्यांनी येऊन सांगितलं की..."; अमृता देशमुखने सांगितला अतुल परचुरेंविषयीचा भावुक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:41 PM2024-10-15T12:41:59+5:302024-10-15T12:42:56+5:30
अमृता देशमुखने अतुल परचुरेंविषयीचा भावुक किस्सा सांगून सर्वांना इमोशनल केलंय (atul parchure)
मराठीसोबतच हिंदीतही नाव गाजवणारे लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंनी काल ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरेंच्या निधनामुळे मनोरंजन विश्वातील एक तारा निखळल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. अतुल परचुरेंविषयी एक विशेष गोष्ट म्हणजे ते कायम इतरांच्या कलाकृतींना दाद देण्यासाठी हजेरी लावायचे. अनेक नवोदित कलाकारांना शाबासकीची थाप द्यायचे. अतुल परचुरेंविषयी अशीच भावुक आठवण अभिनेत्री अमृता देशमुखने सांगितली आहे.
अमृताने अतुल परचुरेंविषयी सांगितला भावुक किस्सा
अमृताने अतुल परचुरेंसोबतचा फोटो टाकून लिहिलंय की, "अतुल परचुरे सर..माझी पहिलीच भेट झाली ती "नियम व अटी लागू" बघायला ते झी नाट्य गौरव चे परिक्षक म्हणून आले होते तेव्हा...मध्यंतरात त्यांनी येऊन सांगितलं की "छान काम करतेयस..फार छान"..अर्थातच खूप छान वाटलं ते ऐकून पण त्यावर पहिली गोष्ट मला हीच म्हणावीशी वाटली की तुम्हाला असं बघून फार छान वाटतंय..प्रोत्साहनासाठी ते म्हटले असावे असं मला वाटलं..त्यानंतर झी चं award मला मिळालं आणि I was happily shocked.."
अमृता पुढे लिहिते,"निघताना माझी पुन्हा त्यांच्याशी भेट झाली आणि ते म्हणाले " तू एवढी का shocked होतीस? आम्हाला genuinely तुझं काम आवडलं होतं.." खरं सांगतेय..त्यांच्यासारख्या actor कडून मला हे ऐकायला मिळालं आणि मग विश्वास बसला की ok, ही trophy खरंच माझी आहे...माझी त्यांच्यासोबतची आठवण ही शेवटची आठवण ठरेल असं अजिबात वाटलं नव्हतं...This is not just a memory it’s a treasure for me! Will miss you sir!"