अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 16:34 IST2024-10-15T16:33:43+5:302024-10-15T16:34:16+5:30
दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप
नाटक असो वा मालिका सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं काल निधन झालं. आज दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. आपल्या लाडक्या मित्राला शेवटचा निरोप देताना सर्वच भावुक झाले.
अतुल परचुरे पाच दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांची तब्येत बिघडली होती. वर्षभरापूर्वीच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करत ते बरे झाले होते. नव्या जोमाने कामालाही लागले होते. मात्र इतर आजाराने पुन्हा डोकं वर काढलं. शरिराने साथ दिली नाही आणि काल त्यांच्या निधनाची दु:खद बातमी आली. आज सकाळी त्यांचे पार्थिव दादर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार सगळेच भावुक झाले.
मनसे नेते राज ठाकरे आपल्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले. मित्राच्या आठवणीत त्यांनाही अश्रू अनावर झाले. मराठी मनोरंजनसृष्टीतून इतरही कलाकार हजर होते. संजय मोने, सुकन्या मोने, महेश मांजरेकर, श्रेयस तळपदे, चिन्मयी सुमित, सुचित्रा बांदेकर, निवेदिता सराफ, उमेश कामत, प्रिया बापटस, वंदना गुप्ते यांच्यासह आणखी काही कलाकारांची उपस्थिती होती.