"अतिशय दुःखद घटना... " केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरणी भरत जाधव यांची भावनिक पोस्ट  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 03:49 PM2024-08-09T15:49:01+5:302024-08-09T15:52:01+5:30

काल रात्री ८ ऑगस्ट २०२४ रोजी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली.

marathi actor bharat jadhav share emotional post on kolhapur keshavrao bhosale natyagruha fire accident | "अतिशय दुःखद घटना... " केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरणी भरत जाधव यांची भावनिक पोस्ट  

"अतिशय दुःखद घटना... " केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरणी भरत जाधव यांची भावनिक पोस्ट  

Bharat Jadhav Viral Post  On Kolhapur Fire: काल रात्री ८ ऑगस्ट २०२४ रोजी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. अगदी मध्यरात्रीपर्यंत आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. बघता बघता आगीचे लोट सर्वत्र पसरले आणि होत्याचं नव्हतं झालं. दरम्यान, खासबाग मैदानाकडून ही आग लागल्याचं सांगण्यात येत होतं. अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्याकरिता मोठी कसरत करावी लागली.

दरम्यान, या भीषण आगीमध्ये संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं. त्यामुळे ऐतिहासिक वारसा  लाभलेल्या या वास्तूचं मोठं नुकसान झालं. केशवराव भोसले नाट्यगृहाची झालेली ही अवस्था पाहून कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मराठी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


अशातच मराठी अभिनेते भरत जाधव यांनी स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर केशवराव भोसले नाट्यगृहाचा फोटो शेअर करत त्यापुढे लिहलंय, "अतिशय दु:खद घटना आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे माझ्या सर्वात  आवडत्या नाट्यगृहांपैकी एक आहे. नुकत्याच माझ्या अस्तित्व या नाटकाला महाराष्ट्र राज्य मराठी व्यवसायिक  नाट्य स्पर्धेची भरपूर बक्षिसे मिळाली. या नाटकाची तालीम मी याच नाट्यगृहामध्ये काही महिन्यांपूर्वी केली होती. नाट्यगृह जळणे ही घटना अत्यंत क्लेशदायक व मनाला चटका लावून जाणारी आहे. आज पर्यंतच्या या नाट्यगृहाच्या आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात चिरंतर राहतील". अशा शब्दांत त्यांनी आपली हळहळ व्यक्त केली. 

Web Title: marathi actor bharat jadhav share emotional post on kolhapur keshavrao bhosale natyagruha fire accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.