अखेर पत्नीसाठी भाऊ कदम झाला फोटोग्राफर; व्हिडीओ शेअर करत व्यक्त केलं बायकोप्रतीचं प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 15:15 IST2022-08-11T15:15:00+5:302022-08-11T15:15:00+5:30
Bhau kadam: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या भाऊ कदम याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पत्नीचा फोटो काढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अखेर पत्नीसाठी भाऊ कदम झाला फोटोग्राफर; व्हिडीओ शेअर करत व्यक्त केलं बायकोप्रतीचं प्रेम
स्त्री हट्टापुढे कोणाचं काही चालत नाही असं म्हटलं जातं त्यातच जर ती पत्नी असेल तर काही सवालच नाही. पत्नीचा हट्ट प्रत्येक पुरुषाला पुरवावाच लागतो. असाच काहीसा प्रसंग विनोदवीर, अभिनेता भाऊ कदम (bhau kadam) याच्यासोबत घडला आहे. ज्याच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी चाहते उत्सुक असतात तोच भाऊ कदम यावेळी चक्क पत्नीचा फोटोग्राफर झाला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या भाऊ कदम याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पत्नीचा फोटो काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच या फोटोच्या बँकग्राऊंडला त्याने टाकलेल्या गाण्यातून त्याने पत्नी प्रतीचं प्रेम व्यक्त केलं आहे.
गोरी तेरा गाँव बडा प्यारा..हे गाणं त्याने या फोटोच्या मागे ठेवलं आहे. तसंच My life in front of my eyes असं कॅप्शन देत त्याने त्याच्या पत्नीप्रतीचं प्रेम व्यक्त केलं आहे.
दरम्यान, भाऊ कदमचं त्याच्या कुटुंबावर आतोनात प्रेम असून तो कायम कुटुंबासोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. विशेष म्हणजे भाऊ कदम मराठीतील दिग्गज अभिनेता आहे. मात्र, तरीदेखील तो आणि त्याचे कुटुंबीय अत्यंत साध्या पद्धतीने राहतात. त्यांच्यातील हाच साधेपणा प्रेक्षकांना विशेष आवडत असल्याचं पाहायला मिळतं.