एकेकाळी पुण्याच्या रस्त्यावर पॅम्प्लेट विकायचा प्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, "एमबीए झाल्यानंतर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 04:46 PM2023-09-06T16:46:52+5:302023-09-06T16:48:30+5:30
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला स्ट्रगलचा काळ, म्हणाला...
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजे भूषण प्रधान. अभिनयाबरोबरच भूषण त्याच्या फिटनेसमुळे ओळखला जातो. भूषण त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्षही देताना दिसतो. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. 'कॉफी आणि बरंच काही', 'निवडुंग', 'मिसमॅच' यांसारख्या चित्रपटांतून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. त्याने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.
भूषण प्रधान सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. भूषणने नुकतीच सुलेखा तळवलकरच्या 'दिल के करीब' पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने बालपण आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्सेही सांगितले. भूषणने या मुलाखतीत अभिनय क्षेत्रातील त्याच्या खडतर प्रवासाबद्दलही भाष्य केलं. अभिनयात करिअर करण्याआधी अनेक छोटी मोठी काम केल्याचा खुलासाही भूषणने या मुलाखतीत केला.
भूषण म्हणाला, "मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. आठव्या वर्षीच मी पहिलं नाटक केलं होतं. तेव्हा शाळेत मला अभिनेता म्हणून ओळखलं जायचं. तू कितीही शिक पण हे टॅलेंट जाऊ देऊ नको, असं माझे शिक्षक म्हणायचे. आयुष्यातले प्रत्येक निर्णय मी करिअरच्या दृष्टीकोनातूनच घेतले आहेत. मी एमबीए पर्यंत शिक्षण घेऊन मग करिअरला सुरुवात केली. या क्षेत्रात काही झालं नाही तर माझा प्लॅन बी रेडी होता. एमबीए करताना मी घे भरारी नावाची मालिका केली होती. मी एमबीएच्या फी साठी नाईट शिफ्ट करायचो. आणि वीकेंडला मालिकेचं शूट करायचो."
"सनी देओल पण ६५ वर्षांचा आहे", वयावरुन ट्रोल करणाऱ्यांना अमिषा पटेलने सुनावलं
"एमबीए झाल्यानंतर तुला अभिनयात करिअर करायचं असेल तर कर. पण, त्यासाठी लागणारे पैसे तुझे तुला कमवावे लागतील. मी अनेक छोटी मोठी काम केली आहेत. पुण्याच्या एमजी रोडवरील सिग्नलवर मी पॅम्प्लेट वाटलेले आहेत. त्याचे मला १५० रुपये मिळायचे. ते मी माझ्या पोर्टफोलिओसाठी वापरायचो. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. माझ्या आईनेही कधी मला अशी कामं करू नको म्हणून थांबवलं नाही," असंही भूषणने सांगितलं.