"मी त्यांच्यावर ओरडलो कारण..."; भूषण प्रधानने सांगितला महेश मांजरेकरांसोबत घडलेला प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:18 IST2024-07-18T16:17:26+5:302024-07-18T16:18:25+5:30
भूषण प्रधान महेश मांजरेकरांवर का ओरडला याचा खास किस्सा त्याने लोकमत फिल्मीशी बोलताना शेअर केलाय (bhushan pradhan, mahesh manjrekar)

"मी त्यांच्यावर ओरडलो कारण..."; भूषण प्रधानने सांगितला महेश मांजरेकरांसोबत घडलेला प्रसंग
अभिनेता भूषण प्रधान हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. भूषणला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. भूषणचा 'घरत गणपती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. त्यानिमित्ताने 'लोकमत फिल्मी'शी गप्पा मारताना भूषणने प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासोबतचा अनुभव सांगितला. एक प्रसंग असा घडला होता की भूषण महेश मांजरेकरांवर ओरडला होता. नेमकं काय घडलं पाहा.
...म्हणून मी त्यांच्यावर ओरडलो: भूषण प्रधान
भूषण प्रधान आणि महेश मांजरेकर या दोघांनी काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'जुनं फर्निचर' सिनेमात काम केलं. भूषण म्हणाला, "महेश सरांबद्दल एक भीती होती. मित्र मैत्रिणींनी आधी त्यांच्याबद्दल खूप काही सांगून ठेवलं होतं. पण मला असा काहीच अनुभव नाही आला. महेश सर पण आता जरा शांत झालेत. याशिवाय त्यांच्याबद्दलची भीती आदरात रुपांतरीत झालीय. मला आठवतंय मागे जुनं फर्निचरचा इंटरव्ह्यू करून आम्ही सर्व खाली गेलो. उन्हाळा होता."
भूषण पुढे म्हणाला, "खूप जास्त ऊन होतं. मी खाली सावलीचा आडोसा घेत उभा होतो. महेश सर मात्र उन्हात उभे राहिले होते. मी म्हटलं. 'सर इकडे येऊन उभे रहा. ऊन आहे तिकडे'. ते म्हटले, 'नाही नाही ठीक आहे.' मी म्हटलं, 'खूप उकाडा आहे, हिटवेव्ह आहे. या इकडे.' माझा सुर थोडा मोठा लागला. नंतर मला जाणीव झाली की या वेगळ्या सुरात आपण त्यांच्याशी बोललो. तर वडिलांचा आणि मुलाचा बाँड दोन्हीकडे क्रिएट झाला. आजच्या काळात होते तशी वडिलांची आणि मुलाची मैत्रीपूर्ण बॉंडींग आमच्यात निर्माण झाली. त्यामुळे महेश सरांबद्दल आदर वाढलाय" भूषण प्रधानची भूमिका असलेला 'घरत गणपती' सिनेमा २६ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.