'मैं थकेगा नहीं साला'; जीममध्ये घाम गाळणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचा व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 18:05 IST2022-03-22T18:04:19+5:302022-03-22T18:05:18+5:30
Dr amol kolhe: अमोल कोल्हे यांनी जीममधील वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते हेवी वर्कआऊट करताना दिसत आहेत.

'मैं थकेगा नहीं साला'; जीममध्ये घाम गाळणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचा व्हिडीओ चर्चेत
अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. कधी कलाविश्वाशी निगडीत तर कधी राजकारणाशी निगडीत पोस्ट शेअर करत ते चर्चेत येत असतात. मात्र, यावेळी ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हे यांनी जीममधील वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते हेवी वर्कआऊट करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये हेवी वर्कआऊट केल्यामुळे त्यांचा चांगलाच घाम निघाल्याचं दिसून येत आहे. मात्र, अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील झुके गा नहीं साला हे वाक्य नव्या स्टाइलमध्ये म्हणत त्यांनी त्यांचा वर्कआऊट सुरुच ठेवला आहे. सोबतच या पोस्टला त्यांनी भन्नाट कॅप्शन दिलं आहे.
"यह टायर तो फायर निकला...लेकिन मैं थकेगा नहीं साला...लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल.. ", असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांची तुफान चर्चा रंगली आहे. इतंकच नाही तर ते घेत असलेल्या मेहनतीचं कौतुकही होत आहे.
दरम्यान, अलिकडेच 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत अमोल कोल्हे झळकले होते. या मालिकेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. यापूर्वीही ते अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये झळकले आहेत. तसंच 'साहेब', 'रंगकर्मी', 'राजमाता जिजाऊ', 'अरे आवाज कुणाचा' या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.