Hemant Dhome : "आम्ही बंड केलं की आई..."; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हेमंत ढोमेच्या 'त्या' ट्विटने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:30 PM2022-06-22T12:30:39+5:302022-06-22T12:36:20+5:30

Hemant Dhome Tweet : मराठीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनेही यावर भाष्य केलं आहे. 

Marathi Actor Hemant Dhome Tweet Over Eknath Shinde Revolt and Politics | Hemant Dhome : "आम्ही बंड केलं की आई..."; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हेमंत ढोमेच्या 'त्या' ट्विटने वेधलं लक्ष

Hemant Dhome : "आम्ही बंड केलं की आई..."; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हेमंत ढोमेच्या 'त्या' ट्विटने वेधलं लक्ष

googlenewsNext

मुंबई -  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारला जबरदस्त हादरा बसला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांना शिवसेना गटनेते पदावरून हटवून सेना नेतृत्वाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गुजरातमधील सूरत येथून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांनी सकाळी सकाळी शिवसेनेमध्ये भूकंप घडवणारा दावा केला आहे. आपल्याकडे ४० आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच माझ्याकडा गट हीच खरी शिवसेना आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. याच दरम्यान मराठीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनेही (Hemant Dhome) यावर भाष्य केलं आहे. 

"आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची!" असं म्हटलं आहे. हेमंत ढोमेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या बंडाबाबत एक ट्विट केलं आहे. "आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची! पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटीला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती… काय म्हणता?" असं हेमंतने ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच बंड हा हॅशटॅग वापरला आहे. त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून सध्या त्याच्या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. 

आसाममधील गुवाहाटी विमानतळावर उतरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाणार आहोत. आमच्यासोबत ४० आमदार आहेत. तसेच आणखी १० आमदारांचा आम्हाला पाठिंबा मिळणार आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच आपल्याकडे शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार असून, आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. पहाटे तीनच्या सुमारास गुजरातमधील सूरत येथून निघालेले हे आमदार सकाळी सातच्या सुमारास गुवाहाटी येथे पोहोचले. त्यांना नेण्यासाठी आसाम स्टेट ट्रान्सपोर्टच्या बस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यामधून ते गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. 
 

Web Title: Marathi Actor Hemant Dhome Tweet Over Eknath Shinde Revolt and Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.