"माझ्या गळ्यात खरे फटाके फोडले अन्.."; जयवंत वाडकरांनी सांगितला 'रानटी'चा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 12:47 PM2024-11-28T12:47:52+5:302024-11-28T12:48:22+5:30

जयवंत वाडकरांनी सांगितला रानटीच्या शूटिंगचा खास अनुभव. काय म्हणाले बघा (jaywant wadkar, raanti)

marathi actor jaywant wadkar talk about experience of shoooting raanti movie | "माझ्या गळ्यात खरे फटाके फोडले अन्.."; जयवंत वाडकरांनी सांगितला 'रानटी'चा थरारक अनुभव

"माझ्या गळ्यात खरे फटाके फोडले अन्.."; जयवंत वाडकरांनी सांगितला 'रानटी'चा थरारक अनुभव

सध्या शरद केळकरच्या 'रानटी' सिनेमा चर्चेत आहे.  समीत कक्कड दिग्दर्शित या सिनेमात शरद केळकरसोबतच संतोष जुवेकर, संजय नार्वेकर, जयवंत वाडकर या कलाकारंच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरपासूनच सिनेमाची चर्चा  शिगेला  आहे. अशातच सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीच्याच शॉटमध्ये संजय नार्वेकरजयवंत वाडकरांच्या शरीराभोवती फटाक्यांची माळ बांधून ती पेटवतात असा सीन आहे. त्याबद्दल जयवंत वाडकरांनी अनुभव सांगितलाय.

जयवंत वाडकरांनी सांगितला 'रानटी' अनुभव

जयवंत वाडकर प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, "हा सीन जेव्हा करायचा झाला तेव्हा मला वाटलं नकली माळा आणलेल्या असतील. कारण त्या दिसत होत्या. त्या घालायच्या आणि शॉट द्यायचा. नंतर कोणीतरी डमी येऊन ते करेल, असं वाटलं मला. पण त्यांनी मला खरोखरच्या लावल्या. मी घाबरलो. तर ते  पुढे ठेऊन पेटवलं आणि शॉट्स घेतले. त्या उडत होत्या अंगावर. नंतर मग ते डमी लावलं. असा आमचा हा रानटी डिरेक्टर आहे."

अशाप्रकारे जयवंत वाडकरांनी 'रानटी' सिनेमाच्या शूटिंगचा थरारक अनुभव सांगितलाय. रानटी हा सिनेमा २२ नोव्हेंबरला सगळीकडे रिलीज झालाय. या सिनेमात अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर,नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम,अक्षया गुरव, कैलास वाघमारे,माधव  देवचक्के, सुशांत शेलार,हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट ‘रानटी’ चित्रपटात आहे. सध्या हाऊसफुल्ल प्रतिसादात सिनेमा सुरु आहे.

Web Title: marathi actor jaywant wadkar talk about experience of shoooting raanti movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.