'झोलझाल' करण्यासाठी कुशल सज्ज; खलनायिकी भूमिकेच्या माध्यमातून येणार प्रेक्षकांसमोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 16:11 IST2022-06-30T16:10:38+5:302022-06-30T16:11:21+5:30
kushal badrike: आगामी 'झोलझाल' या चित्रपटात कुशल खलनायकाची भूमिका साकारत असून याविषयीची एक पोस्ट त्याने शेअर केली आहे.

'झोलझाल' करण्यासाठी कुशल सज्ज; खलनायिकी भूमिकेच्या माध्यमातून येणार प्रेक्षकांसमोर
उत्तम अभिनयशैली आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधणारा अभिनेता, विनोदवीर म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike) . आजवरच्या कारकिर्दीत कुशलने प्रेक्षकांचं कमालीचं मनोरंजन केलं आहे. कुशलने काही गाजलेल्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मात्र, यात बऱ्याचदा त्याच्या वाट्याला विनोदी भूमिकाच आल्या. परंतु, पहिल्यांदाच कुशल एका खलनायकाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आगामी 'झोलझाल' या चित्रपटात कुशल खलनायकाची भूमिका साकारत असून याविषयीची एक पोस्ट त्याने शेअर केली आहे.
"मला ना कायम एक व्हिलन करायचा आहे, तशा भुमिकाही येतात, लुक बिक एकदम खत्री. पण, त्या प्रेक्षकांच मनोरंजन करणाऱ्या असतात, विनोदी असतात. त्यातलीच एक भूमिका ही. Don “ददाऊद” १ जुलैला येतोय तुमचं मनोरंजन करायला सिनेमाघरात. “झोलझाल”, असं कॅप्शन देत कुशलने ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, कुशल लवकरच 'झोलझाल' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. मानस कुमार दास दिग्दर्शित हा चित्रपट १ जुलै रोजी म्हणजे उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाढवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक ही दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत.