Manasi Naik : मी माझ्या आईवडिलांना वचन दिलंय..., तुनिषाच्या आत्महत्येनंतर मानसी नाईकची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 14:14 IST2022-12-27T14:12:43+5:302022-12-27T14:14:30+5:30
Manasi Naik : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक नुकतीच नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. अशात तुनिषाच्या आत्महत्येनंतर मानसीची एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

Manasi Naik : मी माझ्या आईवडिलांना वचन दिलंय..., तुनिषाच्या आत्महत्येनंतर मानसी नाईकची पोस्ट चर्चेत
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. तुनिषानं नैराश्यातून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येच्या 15 दिवस आधी तुनिषाचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअपचं दु:ख सहन झालं नाही आणि तुनिषाने आयुष्याच संपवलं. तुनिषाप्रमाणेच मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) नुकतीच नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. अशात तुनिषाच्या आत्महत्येनंतर मानसीची एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. मी माझ्या आई-वडिलांना वचन दिलं आहे, असं मानसीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. मानसीची ही पोस्ट नेमकी कशाबद्दल आहे, ते जाणून घेऊ यात...
मानसीची पोस्ट...
पोस्टसोबत मानसीने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये ती लिहिते, ‘ मी अशा जगात आहे जिथे हार मानणं खूप सोपं आहे. पण मी माझ्या आई वडिलांना वचन दिलं आहे की मी कधीच गिव्ह अप करणार नाही. माझ्या इच्छाशक्तीला कोणीही कमी लेखू नका. प्रत्येकाचा ब्रेकींग पॉइंट येतो. माझाही आला होता. पण मी रडले नाही आणि रडणार नाही... माझं हृदय मी तोडणार नाही. कारण हे हृदय बनवण्यासाठी माझ्या आईने 9 महिने खर्च केले आहेत. मी कोणतीही समस्या नाही त्यामुळे मी प्रयत्न करत राहिल, शिकत राहिल आणि सदैव चमकत राहीन. मी माझ्या आई बाबांची लाडकी राजकन्या... ’
आत्महत्या हे कुठल्याही समस्येवरचं उत्तर नाही. आयुष्यात कितीही अडचणी, समस्या आल्यात, आपण कितीही निराश झालोत तरी आत्महत्या त्यावरचा पर्याय नाही, हेच मानसीने तिच्या पोस्टमधून सांगितलं आहे.