ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 04:25 PM2023-05-08T16:25:16+5:302023-05-08T16:25:58+5:30

Mohan joshi: 'सांस्कृतिक कलादर्पण' या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा'ने गौरवण्यात आलं. 

marathi actor mohan joshi sanskruti kala darpan award | ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार'

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार'

googlenewsNext

मनोरंजन क्षेत्रात मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार म्हणजे 'सांस्कृतिक कलादर्पण' पुरस्कार. यंदा या पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेता मोहन जोशी यांना सन्मानित करण्यात आलं आहे.  या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा'ने गौरवण्यात आलं. 

चित्रपट विभागात 'मदार' चित्रपटाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठी प्रसाद ओक ( धर्मवीर मु. पो. ठाणे) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी शिवाली परब ( प्रेम कथा धुमशान) आणि अमृता अग्रवाल (मदार) यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 'पिकासो','इंटरनॅशनल फालम फोक', 'वाळवी', 'ताठकणा', 'गावं आलं गोत्यात १५ लाख खात्यात', 'पांडू', 'बालभारती', 'टाइमपास ३', 'आता वेळ आली', 'शहीद भाई कोतवाल' या चित्रपटांनीही विविध विभागात पुरस्कार प्राप्त केले आहेत. यावेळी नाट्य विभागात 'सफरचंद' या नाटकाने सर्वात जास्त पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट वेशभूषा अशा विभागांत पुरस्कार मिळाले आहेत. 
 

'चर्चा तर होणारच', 'कुर्रर्रर्र', 'पुनश्च हनिमून', 'वाकडी तिकडी', 'वुमन' या नाटकांनाही विविध विभागांत पुरस्कार मिळाले आहेत. तर टि. व्ही. मालिका विभागात संत गजानन शेगावीचे ( सन मराठी टि. व्ही) मालिकेने 'सर्वोत्कृष्ट मालिके'चा मान मिळवला असून लक्षवेधी मालिकेचा पुरस्कार 'ठिपक्यांची रांगोळी'(स्टार प्रवाह) ला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार शशांक केतकर (मुरंबा) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार ज्ञानदा रामतीर्थकर (ठिपक्यांची रांगोळी) यांना मिळाला आहे. तुमची मुलगी काय करते, बॉस माझी लाडाची यांनीही पुरस्कार पटकावले. तर पत्रकारिता विभागातही अनेकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

"अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक कलादर्पण सोहळ्याची शान वाढवली. यापैकी काही मान्यवर खूप वर्षांपासून आमच्या परिवारात आहेत तर काही मान्यवर नव्याने आमच्या परिवारात सहभागी झालेत. त्या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो. कला क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलावंतांना  प्रोत्साहन देण्याचे आम्ही मागील अनेक वर्षांपासून करतोय. अशीच उत्तमोत्तम कलाकृती वर्षानुवर्षं या कलाकारांकडून होवो, अशीच इच्छा व्यक्त करतो. या दिमाखदार सोहळ्याचे ब्रॉडकॉस्ट पार्टनर ‘सन मराठी टि. व्ही. होते. लवकरच हा भव्य सोहळा सन मराठी टि. व्हीवर पाहायला मिळेल,’’ असं संस्थापक, अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे म्हणाले.

पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांच्या कलाकृतीचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष  होतं. त्यामुळे अलिकडेच हा दैदिप्यमान सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपट, नाटक, मालिका, तंत्रज्ञ, पत्रकारिता, अशा विविध विभागातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या भव्य सोहळ्याला कलासृष्टीला अनेक तारेतारका, मान्यवर उपस्थित होते.  
 

Web Title: marathi actor mohan joshi sanskruti kala darpan award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.