Prasad Oak : याला म्हणतात मारून मुटकून ‘तारीफ’..., प्रसाद ओकचा बायकोसोबतचा भन्नाट व्हिडीओ एकदा बघाच!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 11:18 AM2022-10-13T11:18:51+5:302022-10-13T11:21:17+5:30
Prasad Oak : या रिल्समध्ये प्रसादसोबत त्याची बायको मंजिरी सुद्धा दिसतेय. ही रिल्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) सोशल मीडियावर किती अॅक्टिव्ह आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. सध्या प्रसादच्या सोशल मीडिया रिल्सची जोरदार चर्चा आहे. होय, या रिल्समध्ये प्रसादसोबत त्याची बायको मंजिरी (Manjiri Oak) ही सुद्धा दिसतेय. ही रिल्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
‘मारून मुटकून तारीफ’ असं मजेशीर कॅप्शन देत प्रसादने पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. यात मंजिरी रोमॅन्टिक मूडमध्ये दिसते. ‘तारीफ करोगे कब तक, बोलो कब तक...,’असं ती प्रसादला विचारते. प्रसाद यावर काय म्हणतो, मंजिरीची किती तारीफ करतो, यासाठी तुम्ही सोबत दिलेला व्हिडीओचं बघायला हवा...
प्रसाद व मंजिरीचा आणखी एक रिलही भन्नाट आहे. व्हिडीओमध्ये मंजिरीनं शॉर्ट वनपीस घालायचा असतो. मात्र प्रसाद वनपीसऐवजी तिथे साडी ठेवतो. नंतर मंजिरीचा लुक बदलून ती साडीमध्ये पहायला मिळते. साडी पाहून ती स्वत: थक्क होते. मग तिला कळतं की हे प्रसादनं केलंय. ‘ह्याला म्हणतात चोमडेपणा, ठीक आहे माझी पण वेळ येईल’असं कॅप्शन देत मंजिरीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दोघांचे हे भन्नाट रील सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अनेक प्रतिक्रियावर चाहत्यांनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. सेलिब्रिटींनीही या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
मंजिरी ही प्रसादसोबत अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करते. शिवाय बिझनेस वुमन अशीही तिची ओळख आहे. सोशल मिडीयावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून ती छोट्या उद्योजकांना मदत करते. 7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरी लग्नबंधनात अडकले होते. प्रसादचा भाऊ हा मंजिरीचा मित्र होता. मंजिरीला सुद्धा अभिनयाची आवड असल्याने भावाच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती. साधारण तीन महिने ही कार्यशाळा होती. त्याच काळात हे दोघे एकमेकांच्या जवळ आहे. कुणीही कुणाला प्रपोज केलं नाही. पण दोघंही एकमेकांत गुंतले होते. यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.