'महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं"; 'धर्मवीर'मधून उलगडणार आनंद दिघेंचा राजकीय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 02:36 PM2022-04-13T14:36:49+5:302022-04-13T14:37:50+5:30

Dharmaveer: आनंद दिघे यांचा जीवनप्रवास 'धर्मवीर' या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.

marathi actor prasad oak and Pravin Tarde upcoming movie Dharmaveer Teaser out | 'महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं"; 'धर्मवीर'मधून उलगडणार आनंद दिघेंचा राजकीय प्रवास

'महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं"; 'धर्मवीर'मधून उलगडणार आनंद दिघेंचा राजकीय प्रवास

googlenewsNext

'जनसामान्यांचा नेता नाही तर, जनसामान्यांचा आधार' अशी किर्ती मिळवणारे दिवंगत लोकनेते म्हणजे आनंद दिघे. सर्वसामान्यांचे प्रश्न कळकळीने सोडवण्यासाठी आनंद दिघे यांनी त्यांचं आयुष्य खर्ची घातलं. त्यामुळेच त्यांचा हा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक (prasad oak), आनंद दिघे (anand deghe) यांची भूमिका साकारणार आहे.

आनंद दिघे यांचा जीवनप्रवास 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' (dharmveer) या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमधून प्रसाद ओकचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. 

धर्मवीर आनंद दिघे म्हणजे गरीब, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांवर आपली जरब बसवणारे व्यक्तिमत्व. आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार.

माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा ! आनंद दिघे आज लौकिक अर्थाने हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात ते आजही जिवंत आहेत. 

'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिमत्वावर चित्रपट बनवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकंच जिकरीचं आणि त्यातही त्यांची व्यक्तिरेखा साकारणं हे त्याहूनही अवघड काम. परंतु या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय सक्षमपणे पेलण्याची जबाबदारी दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेते प्रसाद ओक यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली आहे.

दरम्यान, हा चित्रपट येत्या १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धर्मवीर मु.पो. ठाणे' असं या चित्रपटाचं नाव आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रसाद ओकचा लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: marathi actor prasad oak and Pravin Tarde upcoming movie Dharmaveer Teaser out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.