नव्या वर्षाची सुखद सुरुवात! प्रसाद ओकने खरेदी केलं नवं घर, हटके नेमप्लेटने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 12:15 PM2024-01-01T12:15:08+5:302024-01-01T12:17:02+5:30

प्रसाद ओकने नवं घर खरेदी केलं आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या या नवीन वर्षाची सुरुवात एकदम गोड झाली आहे.

marathi actor prasad oak buys new home in 2024 shared video | नव्या वर्षाची सुखद सुरुवात! प्रसाद ओकने खरेदी केलं नवं घर, हटके नेमप्लेटने वेधलं लक्ष

नव्या वर्षाची सुखद सुरुवात! प्रसाद ओकने खरेदी केलं नवं घर, हटके नेमप्लेटने वेधलं लक्ष

२०२४ या वर्षाची सर्वत्र दणक्यात सुरुवात झाली आहे. सेलिब्रिटींनीही नववर्षाचं जोरदार स्वागत केलं आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. प्रसाद ओकने नवं घर खरेदी केलं आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या या नवीन वर्षाची सुरुवात एकदम गोड झाली आहे. प्रसादने सोशल मीडियावरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. 

मालिका, नाटक आणि अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारून प्रसादने मराठी कलाविश्वात अल्पावधीतच जम बसवला. प्रसाद सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक अपडेट्स पोस्टद्वारे तो चाहत्यांना देत असतो. नुकतंच प्रसादने नवीन घर घेतलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही बातमी प्रसादने त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. प्रसादने त्याच्या नवीन घराचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. 

प्रसादने शेअर केलेल्या या व्हिडिओत त्याच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. त्याच्या घराबाहेरील नेमप्लेटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महामार्गांवर किमी दर्शविण्यासाठी असलेल्या पाट्यांसारखी नेमप्लेट प्रसादच्या घराची आहे. त्याच्यावर ओक असं लिहिलेलं असून घराचा खोली क्रमांकही लिहिल्याचं दिसत आहे. त्याच्या घराला खास लाडकाचा दरवाजा बसविण्यात आला आहे. तर घराबाहेरील जागेतही खास इंटेरिअर केलं आहे. 

नवीन घर खरेदी केल्याबाबच प्रसादचं सेलिब्रिटींनी अभिनंदन केलं आहे. तर अनेक चाहत्यांनीही त्याच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. सध्या प्रसाद 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये परिक्षकाची भूमिका बजावत आहे.  

Web Title: marathi actor prasad oak buys new home in 2024 shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.