भन्नाट कमेंट करत प्रसादने केली मंजिरीची बोलती बंद; तुम्हीही पाहा त्यांचा हा मजेशीर video
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 13:46 IST2024-04-26T13:46:17+5:302024-04-26T13:46:47+5:30
Prasad oak: मंजिरी आणि प्रसाद सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते भन्नाट रिल्स शेअर करत असतात.

भन्नाट कमेंट करत प्रसादने केली मंजिरीची बोलती बंद; तुम्हीही पाहा त्यांचा हा मजेशीर video
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणजे प्रसाद ओक (prasad oak) आणि मंजिरी ओक (manjiri oak). आजवरच्या कारकिर्दीत प्रसादला मंजिरीने प्रचंड साथ दिली आहे. त्यामुळेच आज प्रसादच्या यशात तिचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे प्रसादलाही याची जाणीव असून तो कायम वेळोवेळी मंजिरीला त्याचं श्रेय देत असतो. ही जोडी कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे ते कायम भन्नाट रिल्स शेअर करत असतात. यात अलिकडेच प्रसादने मंजिरीच्या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केली आहे.
मंजिरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नेटकऱ्यांसोबत काही मजेशीर व्हिडीओ, रिल्स शेअर करत असते. यात बऱ्याचदा तिला प्रसादही साथ देतो. मात्र, यावेळी तिने खास प्रसादसाठीच एक रील शेअर केलं. परंतु, हे रील पाहिल्यावर प्रसादनेही त्याच्यावर मजेशीर कमेंट केली.
'पत्नी को खूश रखनें का बस एकही तरीका हैं. पर्स का मूँह खुला रखें और आपका मूँह बंद रखे', असं मजेशीर रील मंजिरीने शेअर केला.
हे रील पाहून प्रसादनेही त्याच्यावर भन्नाट कमेंट केली. 'पण मी “पर्स” वापरतच नाही', असं म्हणत प्रसादने कमेंट केली. त्याही ही कमेंट नेटकऱ्यांना प्रचंड आवडली असून अनेक जण त्याच्यावर रिप्लाय देत आहेत.