रात्रीची वेळ, हॉरर मालिका अन् आईने रागाच्या भरात लावली कडी; प्रसाद ओकने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:55 PM2024-07-22T12:55:58+5:302024-07-22T12:56:53+5:30

प्रसाद ओकने शेअर केली बालपणीची मजेशीर आठवण. ती वाचताना तुम्हीही खळखळून हसाल (prasad oak)

marathi actor prasad oak share personal experience after watch horror serial kile ka rahasya | रात्रीची वेळ, हॉरर मालिका अन् आईने रागाच्या भरात लावली कडी; प्रसाद ओकने सांगितला 'तो' किस्सा

रात्रीची वेळ, हॉरर मालिका अन् आईने रागाच्या भरात लावली कडी; प्रसाद ओकने सांगितला 'तो' किस्सा

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. प्रसादला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. प्रसादची प्रमुख भूमिका असलेला नवीन सिनेमा 'धर्मवीर २'चा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. प्रसाद विविध मुलाखतीत त्याच्या आयुष्याचे अनुभव शेअर करत असतो. एक हॉरर मालिका बघून प्रसादची 'हसावं का रडावं' अशी अवस्था झाली होती. काय घडलं होतं नेमकं?

किले का रहस्य मालिका बघितली अन्...

प्रसाद ओकने आरपार या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. प्रसाद म्हणतो, "आमच्या लहानपणी किले का रहस्य नावाची मालिका लागायची. भयंकर हॉरर मालिका होती. ती मालिका DD नॅशनलवर लागायची. आमच्याक़डे टीव्ही नव्हता. मी वाड्यात राहिलो . वाड्यात मोठा झालो. आमचा वाडा ओकांचा वाडा. एकीकडे सगळे सख्खे भाऊ. दुसरीकडे सगळे चुलत भाऊ. अशी ती पूर्वापर केलेली विभागणी. दहा वाजता मी काकाकडे जाऊन टीव्ही बघतोय. हे माझ्या घरी आवडायचं नाही. त्याबद्दलचा राग असायचा."

पँट पावसामुळे ओली झाली की...: प्रसाद ओक

प्रसाद पुढे म्हणाला, "एकदा काय झालं आई जाऊ नको म्हणून सांगत होती. पण मी हट्टाने काकाकडे मालिका पाहायला गेलो. पण आईने रागाच्या भरात की तंद्रीत माहित नाही आतुन कडी लावून घेतली . पाऊण तासाचा एपिसोड मी बघितला. रात्र झाली होती. तो एपिसोड खूपच डेंजर होता. त्यात पाऊस पडत होता. मला बाहेर आल्यावर कळलं पाऊस पडतोय. मी एका मिनिटात कुत्र्यासारखा भिजलो आणि आमच्या घराच्या इकडे गेलो. मी दार उघडायला गेलो. दार उघडेना. मी कडी वाजवतोय. मी लहान होतो. किले का रहस्य बघून पावसात भिजतोय. ती पँट पावसामुळे ओली झालीय का कशामुळे हे माहित नाही."

 

 

Web Title: marathi actor prasad oak share personal experience after watch horror serial kile ka rahasya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.