'काही जण आयुष्यात स्वप्नपूर्तीसाठीच येतात'; 'त्या' व्यक्तीसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 03:17 PM2021-09-20T15:17:46+5:302021-09-20T15:18:39+5:30
Prasad oak: प्रसादचं कित्येक वर्षांपासून बिग बींना भेटण्याचं स्वप्न होतं. अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक कायचम त्याच्या अभिनयामुळे ओळखला जातो. 'धुरळा', 'हिरकणी', 'ये रे ये रे पैसा २', 'फर्जंद' अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकलेला प्रसाद सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. विशेष म्हणजे या शोच्या निमित्ताने त्याचं एक कित्येक वर्षांपासूनचं अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं आहे. त्यामुळेच त्याने सोशल मीडयावर एक पोस्ट करत त्याच्या एका खास माणसाचे आभार मानले आहेत.
अलिकडेच 'हास्यजत्रे'च्या टीमने 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय शोच्या मंचावर हजेरी लावली. यावेळी हास्यजत्रेच्या टीमला अभिनेता अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळाली. प्रसादचं कित्येक वर्षांपासून बिग बींना भेटण्याचं स्वप्न होतं. अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा जवळचा मित्र अमित फाळकेने मदत केल्यामुळे प्रसादने त्याचे आभार मानले आहेत.
काही काही मित्र आयुष्यात स्वप्नपूर्ती साठीच आलेले असतात.तसाच एक जवळचा मित्र म्हणजे "अमित फाळके". ज्यानी 2009 साली माझं चित्रपट दिग्दर्शनाचं स्वप्न पूर्ण केलं... मला "हाय काय नाय काय" करता आला तो अमित मुळेच. आणि आता आयुष्यातलं अजून एक स्वप्न पूर्ण झालं ते ही त्याच्यामुळेच. ज्याला मी देव मानत आलोय त्याचं दर्शन झालं... प्रत्यक्ष "बच्चन" साहेबांचं... #महाराष्टाचीहास्यजत्रा हा कार्यक्रम बच्चन साहेब नियमित पाहतात आणि त्यामुळे आमच्या पूर्ण टीमचं कौतुक करण्यासाठी त्यांनीच ही संधी आम्हाला दिली. हास्यजत्रेच्या टीमचा भाग असल्याचा आज प्रचंड अभिमान वाटतोय. मनःपूर्वक आभार "सोनी मराठी" चे आणि खूप खूप खूप प्रेम "अमित फाळके"...!!!, अशी पोस्ट शेअर करत प्रसादने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'धर्माचा विसर पडला का?' गणपती विसर्जनाच्या 'त्या' फोटोमुळे शाहरुख ट्रोल
दरम्यान, केबीसीच्या मंचावर हास्यजत्रेच्या कलाकारांनी उपस्थिती दर्शविल्यामुळे बिग बींनादेखील आनंद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हास्यजत्रेच्या कलाकारांचं कौतुक केलं.