'वर्षानुवर्षाचं स्वप्न जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते..'; राम मंदिरासंबंधित प्रथमेश परबची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 16:56 IST2024-01-22T16:56:30+5:302024-01-22T16:56:58+5:30
Prathamesh parab: प्रथमेशची पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.

'वर्षानुवर्षाचं स्वप्न जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते..'; राम मंदिरासंबंधित प्रथमेश परबची पोस्ट चर्चेत
अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते संपन्न झाली. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज भगवान श्रीराम त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत.त्यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा आनंद व्यक्त केला. यात अभिनेता प्रथमेश परब यानेही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
'वर्षानुवर्षाचं स्वप्न जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते "राम मंदिरासारखं" दिसतं,' असं कॅप्शन देत प्रथमेश परबने श्रीरामाचा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, प्रथमेशसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. यात कंगना रणौत, अनुपम खेर यांसारख्या बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे.