उपेंद्र लिमये, आणि प्रवीण तरडे यांचा ‘आणीबाणी’ २८ जुलैला रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 03:36 PM2023-07-26T15:36:45+5:302023-07-26T16:01:11+5:30

सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, वीणा जामकर, संजय खापरे, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, अशी मराठीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी या ‘आणीबाणी’ चित्रपटात आहे.

Marathi actor pravin tarde upendra limaye film anibani release on 28 july 2023 | उपेंद्र लिमये, आणि प्रवीण तरडे यांचा ‘आणीबाणी’ २८ जुलैला रुपेरी पडद्यावर

उपेंद्र लिमये, आणि प्रवीण तरडे यांचा ‘आणीबाणी’ २८ जुलैला रुपेरी पडद्यावर

googlenewsNext

आपलं स्वातंत्र्य कोणी हिरावून घेतलं तर आपलं तर जीवन नीरस होतं,  भारतातल्या जनतेला ‘आणीबाणी’ लागली होती, त्याकाळात हे प्रकर्षाने जाणवलं होतं. याच पार्श्वभूमीवर एका छोट्याशा गावात घडलेल्या घटनेचा विनोदी अंगाने परामर्श घेत ‘आणीबाणी’ या चित्रपटाची कथा रचण्यात आली आहे. सयाजी शिंदे,  उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे,  वीणा जामकर,  संजय खापरे, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, किशोर महाबोले, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर,  धनंजय सरदेशपांडे अशी मराठीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी या ‘आणीबाणी’ चित्रपटात आहे. मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखक अरविंद जगताप यांच्या सोबतीने केलं आहे. २८ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.  

आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही हलकी-फुलकी गोष्ट आहे. या चित्रपटातील नायकाच्या अभिमन्यूच्या अफलातून संघर्षाची, एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची, नवरा बायकोच्या प्रेमाची आणि सोबत बापलेकाच्या नात्याची. ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले ‘आणीबाणी’ तून कसे बाहेर पडणार? याची मनोरंजक कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे. कथेच्या अनुषंगाने चित्रपटात आलेली गाणीही तितकीच श्रवणीय झाली आहेत. 

‘आणीबाणी’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न देशमुख, दिनेश जगताप यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे, हरिदास शिंदे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदि रामचंद्र, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक, कलादिग्दर्शन सुधीर सुतार तर साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय- किरण कोटा , मिक्सिंग- नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन- मंगेश गाडेकर, संकलक प्रमोद कहार तर नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.  

Web Title: Marathi actor pravin tarde upendra limaye film anibani release on 28 july 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.