‘अफलातून लिटील मास्टर्स’चा १५ वर्षांपूर्वीचा Video व्हायरल, ओळखलंत का या चिमुकलीला?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 08:00 AM2023-03-25T08:00:00+5:302023-03-25T08:00:02+5:30
Throwback Video, Guess Who? : ‘अफलातून लिटील मास्टर्स’ हा कॉमेडी शो तुफान गाजला होता. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या बच्चेकंपनीने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. या शोमधील एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर तुमच्या आवडत्या स्टार्सचे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. फिल्मी स्टार्सच्या बालपणीचे फोटो, व्हिडीओ तर क्षणात व्हायरल होतात. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारही याला अपवाद नाही. तूर्तास असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ आहे, ‘अफलातून लिटील मास्टर्स’चा. हा कॉमेडी शो तुफान गाजला होता. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या बच्चेकंपनीने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. या शोमधील एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओत चिमुकली तिची आई आणि साडीबद्दलचे विविध किस्से सांगताना दिसतेय. प्रशांत दामले आणि सुनील पाल हे परिक्षकाच्या भूमिकेत आहे. तिला तुम्ही ओळखलंत...? आज ही चिमुकली मोठी कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री म्हणूनही ती नावारूपास आली आहे.
अद्यापही तुम्ही या चिमुकलीला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. तिचं नाव आहे, प्रियदर्शनी इंदलकर. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) सध्या जाम चर्चेत आहे. ‘फुलराणी’ हा तिचा सिनेमा गेल्या २२ मार्चला प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रियदर्शनी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावेसोबत ती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करतेय.
वयाच्या १२ व्या वर्षी प्रियदर्शनीने ई टीव्ही मराठी या वाहिनीवरील ‘अफलातून लिटील मास्टर्स’ या कार्यक्रमात भाग घेतला होता. या शोमधील चिमुकल्या प्रियदर्शनीच्या कॉमेडीनं सगळ्यांना खळखळून हसवलं होतं. तिचा हा व्हिडीओ सध्या युट्यूबर व्हायरल होताना दिसत आहे.
शाळेत असल्यापासूनच अभिनेत्री प्रियदर्शनीलाअभिनयाची आणि नृत्याची आवड होती. ‘मौनांतर’ या मराठी नाटकापासूनपासून तिने अभिनयास सुरूवात आहे. या नाटकानंतर तिने ‘खामोशी’ आणि ‘पराना’ यासारख्या नाटकांमध्ये तिने काम केलं. मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना असताना तिला डबिंग करण्याची संधी मिळाली. पाठोपाठ सोनी मराठी वरील ‘असे माहेर नको ग बाई’ या मराठी मालिकेत तिची वर्णी लागली. यानंतर तिने कधीच मागे वळून बघितलं नाही.