"जर कोणी कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावताना दिसलं तर...", मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 10:57 AM2024-11-01T10:57:10+5:302024-11-01T11:00:37+5:30

काही जणांकडून दिवाळीत फटाके फोडताना प्राण्यांना नाहक त्रास दिला जातो. प्राण्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सक्त ताकीद दिली आहे. 

marathi actor pushkar jog shared angry post important message for diwali 2024 | "जर कोणी कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावताना दिसलं तर...", मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

"जर कोणी कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावताना दिसलं तर...", मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

दरवर्षी देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यंदाही सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीला फटाक्यांची आतिषबाजीही केली जाते. पण, काही जणांकडून दिवाळीत फटाके फोडताना प्राण्यांना नाहक त्रास दिला जातो. प्राण्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सक्त ताकीद दिली आहे. 

मराठी अभिनेतापुष्कर जोगने दिवाळीनिमित्त त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने प्राण्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांना आणि त्यांना त्रास देणाऱ्यांना थेट तंबी दिली आहे. "जर कोणी मला कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावताना दिसला तर मी स्वत: येऊन तुमच्या चड्डीच्या आत सुतळी बॉम्ब टाकेन...Pleased say no toxic fire crackers...pets and animals get scared", असं पुष्करने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुष्करची ही पोस्ट चर्चेत आहे. 

पुष्कर जोग हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. जबरदस्त या सिनेमातून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमाने पुष्करला लोकप्रियता मिळवून दिली. आता पुष्कर AI : द धर्मा स्टोरी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या सिनेमाचं दिग्दर्शनही पुष्करनेच केलं आहे. हा एक थरारक चित्रपट असून आजच्या काळातील विदारक सत्य यात दाखवण्यात आले आहे. एक वडील आपल्या मुलीच्या जीवासाठी कसे लढा देतात, हे या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे.  पुष्करने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून स्मिता गोंदकर, दीप्ती लेले याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. २५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: marathi actor pushkar jog shared angry post important message for diwali 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.