struggle story: दुकानाचे साईन बोर्ड पेंट करायचा पुष्कर श्रोत्री; मराठी अभिनेत्याने केलेत बरेच कष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 05:34 PM2023-11-02T17:34:25+5:302023-11-02T17:35:17+5:30

pushkar shrotri: वाचा, पुष्कर श्रोत्रीची स्ट्रगल स्टोरी

marathi actor pushkar shrotri struggle story paint shop sign board | struggle story: दुकानाचे साईन बोर्ड पेंट करायचा पुष्कर श्रोत्री; मराठी अभिनेत्याने केलेत बरेच कष्ट

struggle story: दुकानाचे साईन बोर्ड पेंट करायचा पुष्कर श्रोत्री; मराठी अभिनेत्याने केलेत बरेच कष्ट

मराठी कलाविश्वातील अभ्यासू अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री (pushkar shotri). उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो चांगला सूत्रसंचालकदेखील आहे.  अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या पुष्करने खऱ्या आयुष्यात बराच स्ट्रगल केला आहे. मुळात आपला खर्च आपण स्वत: उचलावा या मताचा तो आहे त्यामुळे अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून तो लहानमोठी काम करुन स्वत:चे खर्च भागवत होता. याविषयी अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या करिअरविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

काही दिवसांपूर्वीच पुष्करने रिमा अमरापूरकर यांच्या 'मुक्काम पोस्ट मनोरंजन' या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काही आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलत असताना त्याने एकेकाळी दुकानांच्या बाहेर असलेल्या पाट्या रंगवण्यापासून ते रिक्षा चालण्यापर्यंत अनेक काम केल्याचं सांगितलं.

"पैसे कमवण्यासाठी मी ग्रिटिंग्स कार्ड तयार करुन ते विकायचो, दुकानांचे साईन बोर्डस पेंट करुन द्यायचो.  मी रिक्षा चालवायचो. मी असे अनेक उद्योगधंदे केले आणि छंद म्हणूनच मी कॉमर्स ग्रॅज्युएट झालो. हे करत असताना मी स्वत:चे पैसे कमवत होतो. कारण, आपल्या आवडीनिवडी खूप आहेत ना मग त्या पुरवण्यासाठी पैसे लागतात. ते आपल्याचाच कमवावे लागतात. आई-वडिलांनी दिलेल्या पॉकेटमनीमध्ये ते भागत नाहीत. आणि, पैसे कशासाठी हवेत हे सांगायची सोय नाही त्यामुळे मग मी स्वत:चं पैसे कमवून स्वत:चा खर्च भागवत होतो", असं पुष्कर श्रोत्री म्हणाला.

दरम्यान, पुष्करने आज मराठी कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'पिंपळपान', 'हसा चकटफू', 'वादळवाट', 'अवंतिका', 'अवघाची संसार' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, 'मुन्ना भाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्ना भाई', 'जबरदस्त', 'एक डाव धोबीपछाड', 'हापूस', 'झेंडा' अशा कितीतरी गाजलेल्या हिंदी, मराठी सिनेमांमध्ये तो झळकला आहे.
 

Web Title: marathi actor pushkar shrotri struggle story paint shop sign board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.