रवींद्र महाजनी बुडालेले कर्जात, वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरनं फेडलं डोक्यावरचं कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 12:34 PM2023-07-15T12:34:36+5:302023-07-15T13:02:38+5:30
रवींद्र महाजनी यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता, राहत्या घरावरही जप्ती आली होती.
चांगली कथा-पटकथा, रुबाबदार, देखणे रूप असे १९७५ ते १९९० या काळात समीकरण आणि मराठी चित्रपटसृष्टी
मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे १४ जुलै रोजी निधन झाले. शुक्रवारी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात ते मृतावस्थेत आढळले. गेल्या काही महिन्यांपासून रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडे इथल्या एका सदनिकेत भाडेतत्त्वावर राहत होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याला तत्काळ कळवलं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे
मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी. ज्याप्रमाणे सध्या गश्मीर सिनेसृष्टी गाजवत आहे. तसाच एक काळ रविंद्र महाजनी यांनी गाजवला होता. त्यामुळे सिनेसृष्टीत त्यांचा चांगलाच दबदबा होता. मात्र, एक काळ असा होता ज्यावेळी ते कर्जात बुडाला होता. परंतु, अवघ्या १५ वर्षांच्या वयात गश्मीरने वडिलांचं कर्ज कमी करायचा निर्णय घेतला.
कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयासह अन्य क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं. यामध्येच रविंद्र महाजनी यांचंही नाव येतं. रविंद्र महाजनी यांनी अभिनयाव्यतिरिक्त अन्य काही व्यवसाय असावा यासाठी बांधकाम क्षेत्रात पार्टनरशीप केली. परंतु, या क्षेत्रात त्यांची मोठी फसवणूक झाली. इतकंच काय तर त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. राहत्या घरावरही जप्ती आली. त्यावेळी गश्मीरची आई नोकरी करत होती. मात्र, पगार तुटपुंजा होता. म्हणूनच, गश्मीरने कुटुंबाला साथ द्यायचा निर्णय घेतला.
गश्मीरने असा उभा केला पैसा
एका मुलाखतीत गश्मीरने सांगितलं, वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरने त्याची डान्स अकादमी सुरु केली. याशिवाय तो नाटक, सिनेमा यांमध्ये मिळेल ती भूमिका करायचा. विशेष म्हणजे अवघ्या २ वर्षांमध्ये गश्मीरच्या डान्स अकादमीने चांगला जम बसवला आणि गश्मीरने घरावरचं सगळं कर्ज फेडलं.