अशोक सराफ यांची 'ही' सवय प्रत्येक अभिनेत्याने फॉलो करावी! सचिन पिळगावकरांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 12:46 PM2024-09-09T12:46:29+5:302024-09-09T12:49:06+5:30

अशोक सराफ यांची कोणती सवय सचिन पिळगावकरांना आवडते, याचा खुलासा त्यांनी केलाय (ashok saraf, sachin pilgaonkar)

marathi actor Sachin Pilgaonkar likes habits of Ashok Saraf ashi hi banvabanvi | अशोक सराफ यांची 'ही' सवय प्रत्येक अभिनेत्याने फॉलो करावी! सचिन पिळगावकरांचा खुलासा

अशोक सराफ यांची 'ही' सवय प्रत्येक अभिनेत्याने फॉलो करावी! सचिन पिळगावकरांचा खुलासा

सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांकडे एक नजर मारली तर त्यांच्या प्रत्येक सिनेमात अशोक सराफ हमखास दिसतात. 'अशी ही बनवाबनवी', 'आत्मविश्वास', 'नवरा माझा नवसाचा', 'एकुलती एक' अशा प्रत्येक सिनेमांमध्ये सचिन - अशोक या जोडीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. इतकी वर्ष सोबत काम करुन अशोक सराफ यांची कोणती सवय सचिन पिळगावकरांना आवडते, याविषयी त्यांनी खुलासा केलाय.

अशोक सराफ यांची ही सवय सचिन पिळगावकरांना आवडते

माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकरांंनी अशोक सराफ यांची कोणती सवय आवडते याविषयी खुलासा केलाय. सचिन पिळगावकर म्हणतात, "अशोक सराफकडून मी कोणती गोष्ट टिपली असेल तर ती म्हणजे शिस्त. तुम्ही रिहर्सलला जे केलं नसेल ते टेकमध्ये नाही करायचं. भरपूर कलावंतांना सवय असते की टेक करताना काहीतरी add करतात. जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुमच्या समोरच्या कलाकाराला सांगून करा. शिस्त नावाची गोष्ट पाहिजे. तुमची हौस पूर्ण करायला तुम्ही काम करत नाहीत. अभिनय हे एक प्रोफेशन आहे."


सचिन पिळगावकर पुढे म्हणतात, "अशोक सराफची ही सवय आहेच. शिवाय शिस्त म्हणजे वेळेवर येणं. स्वतःचे संवाद पाठ करणं. त्या संवादांचा अर्थ शोधणं, त्यानंतर कॅरेक्टरशी निष्ठावान होणं. तुमचा अभिनय चालला असं लोकांना वाटतं. परंतु वस्तूस्थिती ही आहे की, तुम्ही कॅरेक्टरला न्याय दिला म्हणून तुमचा अभिनय लोकांना आवडला." अशाप्रकारे सचिन पिळगावकर यांनी अशोक सराफ यांच्या आवडणाऱ्या सवयींचा उल्लेख केला.

Web Title: marathi actor Sachin Pilgaonkar likes habits of Ashok Saraf ashi hi banvabanvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.