बाबा अमेरिकेहून गंमत आणणारे..! संकर्षण म्हणतो, "जगातला सगळ्यात भारी Video कॉल"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 11:54 AM2023-10-02T11:54:57+5:302023-10-02T11:56:14+5:30

संकर्षणला मुलगी स्रग्वी आणि मुलगा सर्वज्ञ अशी जुळी मुलं आहेत.

marathi actor sankarshan karhade shares screenshot of his video call with daugher says best video call in the world | बाबा अमेरिकेहून गंमत आणणारे..! संकर्षण म्हणतो, "जगातला सगळ्यात भारी Video कॉल"

बाबा अमेरिकेहून गंमत आणणारे..! संकर्षण म्हणतो, "जगातला सगळ्यात भारी Video कॉल"

googlenewsNext

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) नेहमीच त्याच्या हटके पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. कधी तो बस चालवताना दिसतो तर कधी थेट विमानात पायलट सीटवर असतो. संकर्षण सध्या 'नियम व अटी लागू' या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर आहे. तिथून तो जेव्हा आपल्या जुळ्या मुलांना व्हिडिओ कॉल करतो तेव्हा काय गंमतीजमती घडतात याची झलक त्याने दाखवली आहे.

संकर्षणला मुलगी स्रग्वी आणि मुलगा सर्वज्ञ अशी जुळी मुलं आहेत. दोघंही आता २ वर्षांची आहेत. आपला बाबा दूर अमेरिकेला गेलाय म्हणल्यावर ते संकर्षणला व्हिडिओ कॉल करत असतात. तेव्हा बाबाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर शब्दात सांगता न येणारच असेल. बाबा अमेरिकेला गेलेत म्हणल्यावर गिफ्ट तर आणणारच. संकर्षणने व्हिडिओ कॉलचा एक स्क्रीनशॉट टाकून 'बाबा अमेरिकेहून गंमत आणणारे, जगातला सगळ्यात भारी Video call' असं लिहिलंय. या कॉलच्या स्क्रीनशॉटमध्ये संकर्षणची लेक स्रग्वीचा फोटो आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

संकर्षणच्या पोस्टवर चाहतेही कमेंट करत आहेत. 'मुलींसाठी बाप म्हणजे...जादूगारच असतो...बाप काय करेल सगळ्यात भारी' अशी कमेंट एकीने केली आहे. संकर्षणचा लेकीसोबत असलेला हा खास बाँड यातून दिसून येतोय. संकर्षणचा नुकताच 'तीन अडकून सीताराम' हा सिनेमाही रिलीज झाला आहे. तर सध्या त्याचे 'नियम व अटी लागू' आणि 'तू म्हणशील तसं' हे दोन्ही नाटकं जोरात सुरु आहेत. 

Web Title: marathi actor sankarshan karhade shares screenshot of his video call with daugher says best video call in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.