'अश्लील photo post केले जात आहेत..'; संतोष जुवेकरचं फेसबुक अकाऊंट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 11:06 AM2022-07-03T11:06:14+5:302022-07-03T11:08:59+5:30

Santosh juvekar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या संतोषने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं सांगितलं आहे.

marathi actor santosh juvekar facebook page hacked actor share post | 'अश्लील photo post केले जात आहेत..'; संतोष जुवेकरचं फेसबुक अकाऊंट हॅक

'अश्लील photo post केले जात आहेत..'; संतोष जुवेकरचं फेसबुक अकाऊंट हॅक

googlenewsNext

अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर(Santosh juvekar). 'झेंडा', 'मोरया', ' रेगे' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून संतोषने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. दमदार अभिनयामुळे चर्चेत असणार संतोष सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अलिकडेच त्याचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. याविषयी त्याने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या संतोषने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं सांगितलं आहे. तसंच या अकाऊंटवरुन काही अश्लील फोटो पोस्ट केले जात असल्यामुळे याकडे दुर्लक्ष करा म्हणत त्याने रितसर पोलिस तक्रारही दाखल केली आहे.

काय आहे संतोषची पोस्ट?

“मित्रांनो माझं facebook page काही महिन्यांपूर्वी hack झालं होत. त्यावर फारच अश्लील photo post केले जात आहेत. मी ह्याची रितसर तक्रार केली आहे cyber crime आणि local police station ला पण अजूनही ही व्हायातगीरी सुरूच आहे. कृपया करून त्या page ला report करून block करा. माझ्या त्या page च्या profile चा screenshot इथे टाकत आहे जेणे करून तुम्हाला ते ओळखण्यास सोप्पे जाईल. तुमच्या ह्या सहकार्यासाठी धन्यवाद”, अशी पोस्ट संतोषने शेअर केली आहे.

दरम्यान, अनेक मालिका, चित्रपटांमध्ये झळकलेल्या संतोषचा 'हिडन' हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला असून यात त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. 

Web Title: marathi actor santosh juvekar facebook page hacked actor share post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.