"मला या आकड्यापेक्षा...", संतोष जुवेकरने 'छावा'साठी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत; प्रेक्षकांना म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 18:49 IST2025-02-16T18:44:24+5:302025-02-16T18:49:02+5:30

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या सिनेमाची चांगलीच चर्चा होत आहे.

marathi actor santosh juvekar post after seeing the response to the film chhaava by fans starring vicky kaushal and rashmika mandanna | "मला या आकड्यापेक्षा...", संतोष जुवेकरने 'छावा'साठी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत; प्रेक्षकांना म्हणाला...

"मला या आकड्यापेक्षा...", संतोष जुवेकरने 'छावा'साठी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत; प्रेक्षकांना म्हणाला...

Santosh Juvekar Post: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा'  (chhaava movie) या सिनेमाची चांगलीच चर्चा होत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला. 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी १४ फेब्रुवारी या दिवशी या सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे रिलीज पूर्वीच या सिनेमाची जोरदार चर्चा होत होती. परंतु प्रदर्शनानंतर सुद्धा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या मल्टिस्टारर सिनेमात विकी कौशल  (vicky kaushal) आणि रश्मिका मंदानासह बरेच मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर सुद्धा या चित्रपटाच महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. सध्या बॉक्स ऑफिसवर 'छावा' सिनेमाला प्रेक्षरकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. याचनिमित्ताने संतोष जुवेकरने (santosh juvekar) केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.


बहुचर्चित 'छावा' या चित्रपटाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देताना दिसत आहेत. विकी कौशलच्या चाहत्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींना देखील या चित्रपटाने भुरळ घातली आहे. दरम्यान, आता छावा या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून संतोष जुवेकर भारावून गेला आहे आणि त्यानिमित्त त्याने  या चित्रपटासाठी एक खास पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, "मला या आकड्यापेक्षा प्रत्येक सिनेमागृहातल्या माझ्या मायबाप प्रेक्षकांचा आकडा बघायला आणि ऎकायला आवडेल. माझ्या धाकल्या धनींना बघायला आणि समजून घ्यायला येणाऱ्या माझ्या भगव्या रक्ताचा कल्लोळ झाला पाहिजे. जय भवानी जय शिवराय, जय संभाजी राजे...!" अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याने चाहत्यांना आवाहन सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय. 

दरम्यान, 'छावा' या सिनेमा पाहण्यासाठी सिनेरसिकांने थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी केल्याची पाहायला मिळते. अवघ्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम रचले आहेत. 

Web Title: marathi actor santosh juvekar post after seeing the response to the film chhaava by fans starring vicky kaushal and rashmika mandanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.