“माझ्या बाप्पानं मला खूप काही...”, ‘मोरया’साठी संतोष जुवेकरची भावुक पोस्ट, म्हणाला, “१२ वर्ष झाली पण...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 16:40 IST2023-08-21T16:39:37+5:302023-08-21T16:40:13+5:30
"माझ्या काळजातला माझा सिनेमा...मोरया!",संतोष जुवेकर भावुक, म्हणाला, "दरवर्षी बाप्पा येताना..."

“माझ्या बाप्पानं मला खूप काही...”, ‘मोरया’साठी संतोष जुवेकरची भावुक पोस्ट, म्हणाला, “१२ वर्ष झाली पण...”
संतोष जुवेकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘झेंडा’, ‘रेगे’, ‘३६ गुण’, ‘पोलीस लाईन’ अशा अनेक चित्रपटांत काम करुन त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोरया’ सिनेमामुळे संतोष प्रसिद्धीझोतात आला. त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता. संतोष सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने मोरया चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
‘मोरया’ चित्रपटातील गाण्याचा व्हिडिओ शेअर करत संतोषने भावुक पोस्ट लिहिली आहे. “खूप काही दिलंय माझ्या बाप्पानं ह्या सिनेमातून आम्हाला...खास करून मला...माझ्या काही आवडत्या सिनेमानंपैकी हासुद्धा एक माझ्या काळजातला माझा सिनेमा...मोरया! १२ वर्ष झाली पण दरवर्षी बाप्पा येताना माझ्या सिनेमाची आठवण सोबत घेऊन येतो. हा सिनेमा फक्त माझाच किंवा आमचा नाही तर हा सिनेमा त्या प्रत्येक चाळीचा, चाळीतल्या प्रत्येक गणेश उत्सव मंडळातल्या माझ्या प्रत्येक मित्राचा, सगळ्या गणेश भक्तांचा आहे,” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार, पोस्ट शेअर करत म्हणाली...
संतोष जुवेकरने मोरया सिनेमासाठी अवधूत गुप्तेचे आभारही मानले आहेत. “मित्रा अवधूत तू माझ्या पदरात टाकलेलं हे सोनेरी पान कायम माझ्या जवळ माझ्या सोबतच असेल. लव्ह यू मित्रा आणि खूप खूप प्रेम आणि आभार एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि ह्या सिनेमातल्या प्रत्येक कलाकारांचे आणि ह्या सिनेमाशी जोडले गेलेल्या प्रत्येकाचे...गणपती बाप्पा मोरया”, असं म्हणत संतोषने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
सनी देओलच्या मदतीसाठी धावून आला अक्षय कुमार, बंगला वाचवण्यासाठी अभिनेता करणार ४० कोटींची मदत?
‘मोरया’ चित्रपटात संतोषबरोबर अभिनेता चिन्मय मांडलेकर, दिलीप प्रभावळकर, स्पृहा जोशी, गणेश यादव, सुबोध भावे, परी तेलंग या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील गाणीही आजही सुपरहिट आहेत.