Sharad Ponkshe "व्वा राजसाहेब... मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे विचार मांडले," शरद पोक्षेंकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 01:22 PM2022-05-02T13:22:18+5:302022-05-02T13:34:02+5:30

Sharad Ponkshe : राज ठाकरे यांच्या सभेनंतर उत्तम अभिनय आणि परखड मतं मांडणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

marathi actor sharad ponkshe praises mns leader raj thackeray after aurangabad rally commented on twitter | Sharad Ponkshe "व्वा राजसाहेब... मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे विचार मांडले," शरद पोक्षेंकडून कौतुक

Sharad Ponkshe "व्वा राजसाहेब... मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे विचार मांडले," शरद पोक्षेंकडून कौतुक

googlenewsNext

"लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे. शांतता बिघडवण्याची माझी इच्छा नाही. सर्व लाऊडस्पीकर अनधिकृत असून उत्तर प्रदेशातील लाऊडस्पीकर उतरू शकतात, तर महाराष्ट्रातही उतरले पाहिजेत. आज एक तारीख, उद्या दोन, तीन ईद. पण चार मे नंतर ऐकणार नाही," असा इशारा देत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्यासाठी तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला. औरंगाबाद येथे रविवारी राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, या सभेनंतर उत्तम अभिनय आणि परखड मते मांडणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

"व्वा राजसाहेब व्वा. आम्ही भारतीय आज सुखावलो. बऱ्याच काळाने एक जबरदस्त विचार, विशेषतः मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे आमच्या मनातले विचार मांडलेत, धन्यवाद," असं शरद पोंक्षे म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या मताचं कौतुक केलं आहे. शरद पोक्षे हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. तसंच आपले विचारही ते अतिशय परखडपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात.


यापूर्वी राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा पार पडली होती. त्या सभेनंतरही पोंक्षे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक करत आपली प्रतिक्रिया दिली होती. "आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं. बऱ्याच काळान धारदार भाषण. हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण. धन्यवाद राजसाहेब," असं ते म्हणाले होते.

काय म्हणाले राज ठाकरे?
४५ मिनिटांच्या सभेत ठाकरे यांनी इतिहासाचे दाखले देत संदर्भ सादर केले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांतील हवाला देत पवार यांच्यावर टीका करीत त्यांना ‘हिंदू’ या शब्दाची ॲलर्जी असल्याचा घणाघात केला. देवगिरी, पैठण या राजधान्या, खिलजीने केलेले अतिक्रमण, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना घेऊन निर्माण केलेले साम्राज्य यावर प्रकाश टाकून राज यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली. राज्यात समाजवाद, बुद्धीजम, हिंदुजम, कम्युनिजम विचार होता. सध्या टिंगलटवाळी सुरू आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. देशाला विचारवंत, समाजसुधारक महाराष्ट्राने दिले. मात्र आज राज्याची अवस्था वाईट झालेली आहे. ही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर झाली असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

Web Title: marathi actor sharad ponkshe praises mns leader raj thackeray after aurangabad rally commented on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.