हातात धनुष्यबाण घेऊन पोज देणारा हा बालक आज आहे मराठीतला हँडसम हिरो, तुम्ही ओळखलंत?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:00 AM2022-03-31T07:00:00+5:302022-03-31T07:00:01+5:30
Throwback : हातात धनुष्यबाण घेऊन लक्ष्यावर निशाणा साधण्याच्या तयारीत असलेला हा चिमुकला कोणी सामान्य बालक नाही तर मराठी चित्रपट व मराठी मालिकांमधील हँडसम हिरो आहे.
सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होतोय. होय, फोटो आहे एका चिमुरड्याचा. हातात धनुष्यबाण घेऊन लक्ष्यावर निशाणा साधण्याच्या तयारीत असलेला हा चिमुकला कोणी सामान्य बालक नाही तर मराठी चित्रपट व मराठी मालिकांमधील हँडसम हिरो आहे. बालपणी सैनिक बनण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि त्यामुळे धनुष्यबाण, खेळण्यातील बंदुकांसोबत तो लहानपणी मनसोक्त खेळायचा. आता हा हिरो कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. अजूनही तुम्ही त्याला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. हा आहे मराठीचा हँडसम हिरो शशांक केतकर ( Shashank Ketkar ).
शशांक हा केवळ उत्तम अभिनेमाच नाही नाही तर एक उत्तम लेखक, कवी आणि राष्ट्रीय स्तरावरचा स्वीमर आहे. फोटोग्राफी, भटकंती हे शशांकचे आवडते छंद आहेत. तो इंजिनिअर आहे. पुण्यातील के.डी. वाय. पाटील कॉलेजमधून त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. मुळात इंजिनिअर असेलल्या शशांकने ऑस्ट्रेलियातून एमईएम (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट) केले आहे. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर शशांकने पुण्याचा सुदर्शन रंगमंच जॉईन केला. तिथे सचिन कुंडलकर दिग्दर्शित पूर्णविराम हे नाटक मिळले. हे त्याचे पहिले नाटक.
‘कालाय तस्मै: नम:’ ही शशांकची पहिली मराठी मालिका. त्यानंतर सुवासिनी, स्वप्नांच्या पलीकडे, फिरुनी नवी जन्मेन या मालिकांमध्ये त्याने छोटेखानी भूमिका साकारल्या. रंग माझा वेगळा ही शशांकची मुख्य भूमिका असलेली पहिली मालिका होती. मात्र शशांकला खरी ओळख मिळाली ती झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे. या मालिकेत शशांकने श्रीरंग नावाच्या उद्योजकाची भूमिका साकारली होती.
तेजश्री प्रधानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर शशांकने दुसरे लग्न करत आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात केली. पेशाने वकील असणा-या प्रियांकासह शशांक पुन्हा रेशीमगाठीत अडकला. वैवाहिक जीवनात खूप खुश असून आपले खाजगी आयुष्य एन्जॉय करत आहे.