सिद्धार्थ चांदेकर दुबईत मिस करतोय घरचं जेवण; म्हणतो, 'शेव भाजी, मिरची-लसणाचा ठेचा आणि..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:21 IST2023-10-02T13:21:13+5:302023-10-02T13:21:57+5:30
Siddharth chandekar: सिद्धार्थ सतत विदेशातील पदार्थ खाऊन आता कंटाळला आहे.

सिद्धार्थ चांदेकर दुबईत मिस करतोय घरचं जेवण; म्हणतो, 'शेव भाजी, मिरची-लसणाचा ठेचा आणि..'
मराठी कलाविश्वातील हँडसम हंक अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (Siddharth chandekar). उत्तम अभिनेता असलेला सिद्धार्थ सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो कायम नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर ही जोडी कायम नवनवीन ठिकाणांना भेट देत असतात. तेथील काही किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या सिद्धार्थ दुबई दौऱ्यावर असून येथे तो आपलं घरचं जेवण प्रचंड मिस करतोय.
सिद्धार्थ सध्या दुबईमध्ये असून येथील अनेक नवनवीन ठिकाणांना तो भेट देत आहे. यामध्येच सतत विदेशातील पदार्थ खाऊन आता तो चांगलाच कंटाळला आहे. त्यामुळे आता त्याला घरच्या जेवणाची आठवण येत आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थांविषयी भाष्य केलं आहे.
“आदल्या दिवशीचा चिकन-मटणाचा किंवा शेव भाजीचा रस्सा, शिळ्या भाकरीचा कुस्करा, मिरची धणे आणि लसणाचा ठेचा आणि शेवटी घट्ट झालेली शेवयाची खीर. बास. पुरेसं आहे”, असं म्हणत सिद्धार्थने पोस्ट शेअर केली आहे. सोबतच ‘अजून नको काही’ असंही कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.