‘मला नाही माहित, मला नाही जमत...’; सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 11:02 AM2022-02-17T11:02:24+5:302022-02-17T11:02:51+5:30
Siddharth Chandekar Post : सिद्धार्थ चांदेकर हा सर्वांचा आवडता अभिनेता. चाहत्यांना पडद्यावरचा त्याचा अभिनय भावतो, तितकाच सोशल मीडियावरचा त्याचा वावरही.
सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा सर्वांचा आवडता अभिनेता. चाहत्यांना पडद्यावरचा त्याचा अभिनय भावतो, तितकाच सोशल मीडियावरचा त्याचा वावरही. सोशल मीडियावर सिद्धार्थ प्रचंड अॅक्टिव्ह आहे. तो सतत त्याच्या पर्यटनाचे,ट्रॅकिंगचे,जंगल सफारीचे,बायको मिताली सोबतचे फन व्हिडीओ शेअर करत असतो. शिवाय त्याचे स्फुटलेखनही शेअर करत असतो. सध्या त्याची अशीच एक पोस्ट चर्चेत आहे. सोशल मीडियावरील त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
‘मला नाही माहित,मला नाही येत,मला नाही जमत. हे म्हणायला किती धाडस लागतं. मी कुणीतरी आहे,हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहासात मी आहे हे स्वत:ला कधी सांगणार?, ’अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली आहे. ‘मी मीच आहे’, अशा कॅप्शनसह त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
सिद्धार्थच्या या पोस्टचा चाहते आपआपल्यापरीने अर्थ लावत आहेत. पण अनेकांनी त्याच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे. खरं आहे, भारी लिहितोस राव, वाह अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
‘हमने जिना सीख लिया’ या हिंदी सिनेमाद्वारे 2007 मध्ये सिद्धार्थ प्रेक्षकांसमोर आला. 2010मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्याने पहिलं पाऊल टाकलं. ‘क्लासमेट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली. पिंडदान, बालगंधर्व, सतरंगि रे, संशयकल्लोळ, वजनदार,आॅनलाईन बिनलाईन, लॉस्ट अँड फाउंड, बस स्टॉप, गुलाबजाम, वजनदार, झिम्मा या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
सिद्धार्थने 2008मध्ये ‘अग्निहोत्र’ या मालिकेत ‘नील’ची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याशिवाय तो कशाला उद्याची बात, मधू इथे आणि चंद्र तिथे , प्रेम हे या मालिकांमध्येही झळकला.