सुबोध भावेच्या लेकांची होतीये चर्चा; बाप्पाची स्थापना करण्यासोबतच दिला पर्यावरणपूरक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 04:19 PM2022-08-31T16:19:22+5:302022-08-31T16:20:34+5:30

Subodh bhave: बाप्पाचं आगमन होण्यापूर्वी सारेच जण त्याच्या स्वागताची जल्लोषात तयारी करत असतात. यात खासकरुन बाप्पासाठी बसायचं आसन आणि डेकोरेशन यावर अनेक जण काम करतात.

marathi actor Subodh bhave ganpati bappa home decoration | सुबोध भावेच्या लेकांची होतीये चर्चा; बाप्पाची स्थापना करण्यासोबतच दिला पर्यावरणपूरक संदेश

सुबोध भावेच्या लेकांची होतीये चर्चा; बाप्पाची स्थापना करण्यासोबतच दिला पर्यावरणपूरक संदेश

googlenewsNext

गेल्या कित्येक दिवसांपासून गणेशभक्त त्यांच्या लाडक्या बाप्पाची वाट पाहत होते. अखेर आज सगळ्यांची प्रतीक्षा संपली असून अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यात अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या गणरायाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यात अभिनेता सुबोध भावे (Subodh bhave)  याचा बाप्पा आणि त्याच्यासाठी केलेली आरास विशेष चर्चिली जात आहे.

बाप्पाचं आगमन होण्यापूर्वी सारेच जण त्याच्या स्वागताची जल्लोषात तयारी करत असतात. यात खासकरुन बाप्पासाठी बसायचं आसन आणि डेकोरेशन यावर अनेक जण काम करतात. काही जण या देखाव्यांमधून सध्याची परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करतात. तर, काही जण डोळ्यांना भावणारं डेकोरेशन करतात. यात यंदा सुबोध भावेच्या दोन्ही लेकांनी मिळून खास डेकोरेशन केलं आहे. या देखाव्यामधून त्यांनी पर्यावरणाचा -हास रोखण्याचा संदेश दिला आहे.

"श्री गणेशाचं आगमन आज झालं. सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या घरच्या देखाव्याची कल्पना आणि सादरीकरण या वर्षीही मुलांनी केलं. "आनंदी पृथ्वी आणि दुःखी पृथ्वी". निसर्गाचा सांभाळ केला तर आनंदी पृथ्वी आणि निसर्गाचा नाश केला तर दुःखी पृथ्वी. नवीन पिढीला निसर्ग जपण्याचं महत्त्व कळतंय. निसर्ग जपण्याची बुध्दी आणि शक्ती आपल्या अंगी येवो हीच गणराया चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया", असं कॅप्शन देत सुबोधने त्याच्या लाडक्या बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, सुबोधच्या दोन्ही लेकांनी मिळून गेलेल्या देखाव्यामध्ये त्याने पृथ्वीची दोन रुपं दाखवली आहेत. एकामध्ये पृथ्वी हसताना दिसते. तर दुसऱ्यामध्ये पृथ्वी दु:खी, कष्टी आहे. जर आपण निर्सगाचा होणारा -हास रोखला तर पृथ्वी आनंदी होईल. पण, जर आपण कचरा, बांधकाम वा अन्य -हास होणारी कामं केली तर पृथ्वीचा विनाश होईल ज्यामुळे ती रडेल असं या देखाव्यातून त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे.

Web Title: marathi actor Subodh bhave ganpati bappa home decoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.