"हा मान आपल्या महाराष्ट्राला मिळतो, अभिमान वाटतोय…”, सुबोध भावेची पोस्ट झाली व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 11:51 AM2022-05-28T11:51:33+5:302022-05-28T11:53:14+5:30

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणून सुबोध भावे(Subodh Bhave)ची ...

Marathi actor Subodh Bhave new post viral on internet | "हा मान आपल्या महाराष्ट्राला मिळतो, अभिमान वाटतोय…”, सुबोध भावेची पोस्ट झाली व्हायरल

"हा मान आपल्या महाराष्ट्राला मिळतो, अभिमान वाटतोय…”, सुबोध भावेची पोस्ट झाली व्हायरल

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणून सुबोध भावे(Subodh Bhave)ची ओळख आहे. सध्या सुबोध भावेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. मुंबईत उभ्या राहणाऱ्या मराठी नाट्य विश्व या नाट्य संग्रालयाच्या बोधचिन्हाचे आनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याच संदर्भात सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे आभार मानलेत. 

सुबोधने आपल्याला पोस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहेत. यासोबत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

तुम्हा सगळ्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर करताना अतिशय अभिमान वाटतोय. जगभरात कुठेही नाटकाचं संग्रहालय नाही.
जगातील पहिलं नाटकाचं संग्रहालय उभारण्याचा मान आपल्या महाराष्ट्राला मिळतोय. आणि हे संग्रहालय असणार आहे मराठी नाटकाचं "मराठी नाट्य विश्व" मुंबई येथे गिरगाव चौपाटी वर सद्य स्थितीत असलेल्या बिर्ला क्रीडा केंद्र च्या जागी हे भव्य दिव्य आणि मराठी नाटकाचा इतिहास सांगणार "मराठी नाट्य विश्व" उभं राहतय. मराठी नाटकाच्या सर्व शाखा आणि सर्वांना सामावून घेणारं हे संग्रहालय असेल. जगभरातील नाटकाच्या अभ्यासक आणि रसिक प्रेक्षकांसाठी हे एक आनंदाचं दालन असेल. ही कल्पना आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांची. त्यांच्या कल्पनेतून हे मराठी नाटकाचं संग्रहालय उभे रहात आहे. महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होतंय. आणि आज मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते "मराठी नाट्य विश्व" चं बोधचिन्ह आणि वास्तूचं स्वरूप लोकार्पण करण्यात आलं. आम्हा सर्व रंगकर्मी आणि नाटकावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असे सुबोधनं या पोस्टमध्ये म्हटलंय.


सुबोध भावेच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसह चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतायेत. कमाल भावा, संपूर्ण टीमचं अभिनंदन अशी कमेंट यावर अभिनेता स्वप्निल जोशीने केली आहे. तुझा अभिमान आहे असं जितेंद्र जोशीने लिहिलंय. 

Web Title: Marathi actor Subodh Bhave new post viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.