'जरा एक दिवस मी....' सुबोध भावेची सूचक पोस्ट; महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याशी कनेक्शन?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 09:31 AM2023-07-03T09:31:37+5:302023-07-03T10:12:36+5:30
अनेक मराठी कलाकारांनीही या सत्तानाट्यावर पोस्ट करत मत व्यक्त केलंय.
काल महाराष्ट्राच्याराजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवारांनी (Ajit Pawar) राजभवनावर दाखल होत थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावर सोशल मीडियावर नुसता मीम्सचा पाऊस सुरु झाला. अनेक मराठी कलाकारांनीही या सत्तानाट्यावर पोस्ट करत मत व्यक्त केलंय. अभिनेता सुबोध भावे नेहमीच परखड मत देत असतो. त्याचं काय म्हणणंय बघा.
महाराष्ट्राच्याराजकारणात अचानक झालेल्या या बदलानंतर सर्वच सोशल मीडियावर तुटून पडले. तेजस्विनी पंडित, सोनाली कुलकर्णी सह काही मराठी कलाकार यावर व्यक्त झालेत. सुबोध भावेने एक अर्धवटच स्टोरी टाकत राजकीय नाट्यावरच प्रतिक्रिया दिल्याचं दिसतंय. त्याने स्टोरी पोस्ट करत लिहिले, 'जरा एक दिवस मी मुंबईच्या बाहेर काय गेलो....क्रमश:....'
सर्वसामान्यांप्रमाणेच सुबोध भावेनेही आपलं म्हणणं अशा पद्धतीने मांडलेलं दिसतंय. 'कोणाला भेळ हवी असेल तर महाराष्ट्रात या' असं अभिनेत्री तेजस्विनी पंडितने लिहिलंय. एकंदर महाराष्ट्रात चाललेलं हे नाट्य आता कोणालाच झेपत नाहीए. मतदारांची तर काही किंमतच या राजकारण्यांनी ठेवली नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. काही जण या सगळ्याची मजा घेत सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.