सेल्फीबाबत सुबोध भावेने व्यक्त केले परखड मत, वाचून तुम्ही देखील त्याच्याशी व्हाल सहमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 11:26 AM2019-07-02T11:26:25+5:302019-07-02T11:27:47+5:30

सेल्फीच्या प्रेमात पडलेल्या लोकांसाठी अभिनेता सुबोध भावेने नुकतेच एक ट्वीट केले आहे.

marathi actor subodh bhave share tweet for selfie lovers | सेल्फीबाबत सुबोध भावेने व्यक्त केले परखड मत, वाचून तुम्ही देखील त्याच्याशी व्हाल सहमत

सेल्फीबाबत सुबोध भावेने व्यक्त केले परखड मत, वाचून तुम्ही देखील त्याच्याशी व्हाल सहमत

googlenewsNext
ठळक मुद्देशार्क माशापेक्षा जास्त बळी मोबाईल मधल्या "सेल्फी" नी घेतले आहेत. टॉयलेट आणि स्मशानात ज्या दिवशी लोक सेल्फी घ्यायला लागले त्या दिवशीच खरतर आधी बुद्धी मेली आणि मग स्वतःचा जीवही गमवयला लागले. भान नसणं आणि सुटणं याचं उत्तम उदाहरण म्हणजे "सेल्फी".

सेल्फीचे फॅड लहानांपासून छोट्या पर्यंत सगळ्यांना लागलेले आहे. सेल्फी काढताना आपण आपला जीव धोक्यात टाकत आहोत याची देखील लोकांना पर्वा नसते. आपण तांत्रिक दृष्ट्या खूप प्रगती केली आहे यात काहीच शंका नाही. याच तंत्रज्ञानामुळे मोबाईल आजकाल सगळ्यांच्या हातात आला आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अतिशय चांगले कॅमेरे आहेत. त्यामुळे एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर या कॅमेराद्वारे फोटो, सेल्फी काढण्याकडे लोकांचा कल असतो. पण यात आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सेल्फीच्या प्रेमात पडलेल्या लोकांसाठी अभिनेता सुबोध भावेने नुकतेच एक ट्वीट केले आहे. शार्क माशापेक्षा जास्त बळी सेल्फीने घेतले असल्याचे सुबोधचे म्हणणे आहे.

सुबोधने नुकतेच एक ट्वीट करत आजच्या सेल्फी क्रेझविषयी भाष्य केले आहे. त्याने ट्विट मध्ये म्हटले आहे की, शार्क माशापेक्षा जास्त बळी मोबाईल मधल्या "सेल्फी" नी घेतले आहेत. टॉयलेट आणि स्मशानात ज्या दिवशी लोक सेल्फी घ्यायला लागले त्या दिवशीच खरतर आधी बुद्धी मेली आणि मग स्वतःचा जीवही गमवयला लागले. भान नसणं आणि सुटणं याचं उत्तम उदाहरण म्हणजे "सेल्फी".



 

सुबोधचे हे ट्वीट त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सुबोधने अगदी योग्य मत व्यक्त केले असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. सेल्फीपेक्षा आपला जीव अधिक प्रिय आहे हे लोकांच्या लक्षात येणे गरजेचे असल्याचे लोक प्रतिक्रियांद्वारे सांगत आहेत. सेल्फी काढण्याच्या नादात आजवर पाण्यात बुडून अथवा उंचावरून पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. सेल्फीमुळे आजवर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असले तरी सेल्फीच्या प्रेमात असलेल्या लोकांना अजूनही जाग येत नाहीये.

 

सुबोध भावे आज मराठीतील आघाडीचा अभिनेता असून तो सोशल मीडियाद्वारे नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहातो. सोशल मीडियाद्वारे आपले खाजगी फोटो, व्हिडिओ शेअर करण्यासोबतच समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. 

सुबोधची तुला पाहते रे ही मालिका सध्या चांगलीच गाजत असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

Web Title: marathi actor subodh bhave share tweet for selfie lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.