मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर वैभव तत्ववादी झळकणार तेलुगू सिनेमात; शेअर केला सेटवरील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:05 IST2025-02-25T15:03:12+5:302025-02-25T15:05:35+5:30
नुकतीच वैभव तत्ववादीने सोशल मीडियावर पोस्ट एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर वैभव तत्ववादी झळकणार तेलुगू सिनेमात; शेअर केला सेटवरील फोटो
Vaibhav Tatwawaadi:वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawaadi) हा मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेता आहे. 'कॉफी आणि बरंच काही','मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'व्हॉट्स अप लग्न' तसेच 'भेटली तू पुन्हा' अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. आपल्या दमदार अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. मराठीबरोबरच हिंदी सृष्टीतही त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे.
अभिनेता वैभव तत्ववादी हा सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. याद्वारे तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकतीच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमधील सेटवरील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. "पहिलं नेहमीच खास असतं. माझी पहिली तेलुगू फिल्म..., नवीन भाषा, नवीन स्टोरी..., " असं कॅप्शन देत अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे अभिनेत्याचे चाहते प्रचंड खुश असल्याचं पाहाला मिळतंय. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर वैभव तेलूगू चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.
दरम्यान, वैभव तत्ववादीची महत्त्वाची भूमिका असणारा पहिला तेलुगू चित्रपट आहे. परंतु या चित्रपटाचं नाव, त्यामधील त्याची भूमिका याबद्दल त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.