'मैंने दिल खो दिया...'; वैभव तत्ववादी पडला 'या' गोष्टीच्या प्रेमात; व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 18:01 IST2024-01-21T18:00:51+5:302024-01-21T18:01:22+5:30
Vaibhav tatwawadi: वैभवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'मैंने दिल खो दिया...'; वैभव तत्ववादी पडला 'या' गोष्टीच्या प्रेमात; व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठी कलाविश्वातील हँडसम हंक म्हणजे वैभव तत्ववादी (vaibhav tatwawadi). उत्तम अभिनय कौशल्य आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर वैभवने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. इतकंच नाही तर त्याचा फिमेल फॅन फॉलोअर्सदेखील प्रचंड आहे. त्यामुळे त्याच्याविषयी नेटकऱ्यांमध्ये काम चर्चा रंगत असते.
वैभवच्या प्रेमात आज असंख्य तरुणी आहेत. त्यामुळे त्याच्या लव्हलाइफविषयी जाणून घेण्यासाठी तरुणी कायम उत्सुक असतात. यामध्येच सध्या वैभवचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे वैभव या व्हिडीओमध्ये अक्षरश: प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे.
अलिकडेच वैभव त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी एका निसर्गरम्य ठिकाणी गेला होता. या ठिकाणचे अनेक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे त्याच्या व्हिडीओवरुन तो या निर्सगाच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे.
सध्या सोशल मीडियावर वैभवचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात तो उंच अशा बर्फाच्छदित पर्वतावर आहे. विशेष म्हणजे त्याने या पर्वतावर 'तेरी बातों में एैसा उलझा जिया, बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया', या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.