मराठी रंगभूमी समृध्द करणारा अभिनेता गमावला - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:12 PM2018-08-24T12:12:20+5:302018-08-24T12:15:12+5:30
प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी व अष्टपैलू अभिनेता आपण गमावला आहे.
मुंबई - प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी व अष्टपैलू अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी रंगभूमी समृध्द करणारा अभिनेता गमावला!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 24, 2018
श्री विजय चव्हाण यांच्या निधनावर मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची शोकसंवेदना pic.twitter.com/dLbwiKxK4u
श्री. विजय चव्हाण यांना एक ताकदीचा विनोदी अभिनेता म्हणून मराठी रसिक ओळखतातच. मात्र त्याचसोबत त्यांनी गंभीर आशयाच्या भूमिकाही समर्थपणे साकारल्या. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत, टूरटूर, हयवदन यांसारखी अनेक नाटके त्यांच्या कसदार अभिनयाने प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांना विनोदाचं उत्तम टायमिंग होते चित्रपट आणि दुरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. मराठी सिनेसृष्टीच्या अलिकडच्या कालखंडातील स्थित्यंतरात श्री. चव्हाण यांनी बहुमूल्य योगदानही दिले होते. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीचे मोठे नुकसान झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.