मराठमोळ्या या अभिनेत्याचं ८५ टक्के निकामी झालं होतं फुफ्फुसं, म्हणाला - "सर्जरीनंतर जवळपास पांगळा झालो होतो"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 03:14 PM2023-08-19T15:14:05+5:302023-08-19T15:14:34+5:30

मराठमोळ्या या अभिनेत्याला आजार वाढल्यामुळे मालिकेलाही करावा लागला होता रामराम

Marathi actor with 85 percent lung failure, said - "I was almost paralyzed after the surgery". | मराठमोळ्या या अभिनेत्याचं ८५ टक्के निकामी झालं होतं फुफ्फुसं, म्हणाला - "सर्जरीनंतर जवळपास पांगळा झालो होतो"

मराठमोळ्या या अभिनेत्याचं ८५ टक्के निकामी झालं होतं फुफ्फुसं, म्हणाला - "सर्जरीनंतर जवळपास पांगळा झालो होतो"

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीत प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अभिनेते म्हणजे विद्याधर जोशी (Vidhyadhar Joshi). अनेक वर्षांपासून ते कलाविश्वात कार्यरत आहेत. त्यांना इंडस्ट्रीत बाप्पा असे संबोधले जाते. अलीकडेच त्यांनी माझा होशील ना, जिवाची होतीया काहिली, वेड या मालिका चित्रपटात काम केले. विद्याधर जोशी हे गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहेत. या आजाराबद्दल त्यांना माहित नव्हते मात्र कोरोनाच्या काळात त्यांना कोरोना होऊन गेला. त्यानंतर त्यांना पुन्हा ताप आला. हा ताप वेगळाच असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी सिटीस्कॅन करण्यास सांगितले. त्यात विद्याधर जोशी यांना ‘फुफ्फुसांचा फायब्रॉसिस’ हा आजार झाल्याचे सांगण्यात आले.

विद्याधर जोशी यांना फुफ्फुसांचा फायब्रॉसिस आजार झाल्यानंतरचा त्यांचा संघर्ष आणि त्यानंतरचा प्रवास मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत विद्याधर जोशी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले आणि काही दिवसानंतर दुसऱ्यांदा कोरोना झाला. त्यावेळी हा ताप साधा नसून यामागे वेगळे कारण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 'सिटी स्कॅन केले. त्यानंतर समजले की, फुफ्फुसांवर जखम झाली आहे. पुढे फुप्फुसांचा फायब्रॉसिस झाल्याचे निदान झाले. त्यानंतर आणखी काही टेस्ट करण्यात आल्यानंतर इंटरस्टीशीयन लंग्स डिसिस झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आजारावर कुठलेच औषध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा आजार बराही होणार नाही फक्त तो आजार वाढू नये यासाठी विद्याधर जोशी यांना औषध देण्यात आली. अशाही परिस्थितीत खचून न जाता विद्याधर जोशी सकारात्मक राहिले. मालिकेतही काम करू लागले. मात्र डिसेंबर ते जानेवारी या अवघ्या दोनच महिन्यात त्यांची फुफ्फुसं ८५ टक्के निकामी झाली असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यावेळी जोशी जीवाची होतीया काहिली मालिकेत काम करत होते. आजार वाढल्यामुळे आणि प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे विद्याधर जोशी यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. 

शरीर मौल्यवान असल्याची झाली जाणीव

त्यानंतर विद्याधर जोशी यांचे दोन्ही फुफ्फुसं निकामी झाली. त्यावर त्यांना फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचा एकमेव पर्याय सांगितला. ही शस्त्रक्रिया खूप खर्चिक असूनही त्यांनी तो करण्याचा निर्णय घेतला. १२ जानेवारी रोजी त्यांच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली. पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते जवळपास पांगळे झाले होते. पायाचे बोटही हलवता येऊ शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपले शरीर किती मौल्यवान आहे याची जाणीव त्यांना यादरम्यान झाली. आपल्याकडे देण्यासारखे काहीच नाही. पण जेव्हा जातो तेव्हा अवयव तरी दान केले पाहिजे असे प्रकर्षाने जाणवले. मी आज वाचलो ते कोणीतरी मला फुफ्फुस दान केल्यामुळेच असे ते सांगतात. 

Web Title: Marathi actor with 85 percent lung failure, said - "I was almost paralyzed after the surgery".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.