ऐश्वर्या नारकरांच्या लेकाचं दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण; रंगमंच गाजवायला झाला सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 14:03 IST2023-09-11T13:59:56+5:302023-09-11T14:03:29+5:30
Aishwarya narkar: ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या लेकाने व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.

ऐश्वर्या नारकरांच्या लेकाचं दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण; रंगमंच गाजवायला झाला सज्ज
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे अविनाश नारकर (avinash narkar) ऐश्वर्या नारकर (Aishwarya narkar) . ९० च्या काळापासून ही जोडी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. आजदेखील ही जोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांच्या संपर्कात राहत असते. विशेष म्हणजे त्यांच्या लेकानेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे. त्यामुळे आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत तोदेखील आता सिनेसृष्टी गाजवायला सज्ज झाला आहे.
ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या लेकाचं नाव अमेय नारकर असं असून त्याने व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. ऐश्वर्या नारकर यांनी नुकतीच सोशल मीडियावर याविषयीची पोस्ट शेअर करत माहिती दिली.
सावधान रहा! सतर्क रहा !! इन्स्पेक्टर.... मागावर आहेत!!! पण कोणाच्या मागावर आहेत? ते कळेल रविवारी १७ सप्टेंबरला संध्याकाळी ६ वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे इथे.... आजकल प्रस्तुत खरा इन्स्पेक्टर मागावर, असं कॅप्शन देत ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या लेकाच्या नव्या नाटकाची माहिती चाहत्यांना दिली.
दरम्यान, आजकल प्रस्तुत ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टॉम स्टॉपार्ड यांच्या द रिअल इन्स्पेक्टर हाऊंड या एकांकिकेवर आधारित हे नाटक असून या नाटकाचं दिग्दर्शन अमेय नारकर करत आहे.