काय आहे ऐश्वर्या नारकर यांचं ब्युटी सिक्रेट? चेहऱ्यावर लावतात 'हा' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:17 IST2025-04-24T14:17:34+5:302025-04-24T14:17:58+5:30

उन्हाळ्यातही ऐश्वर्या यांची त्वचा तजेलदार दिसते. कारण, ऐश्वर्या त्यांच्या त्वचेची खास काळजी घेतात. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

marathi actress aishwarya narkar shared her beauty secret aloe vera | काय आहे ऐश्वर्या नारकर यांचं ब्युटी सिक्रेट? चेहऱ्यावर लावतात 'हा' पदार्थ

काय आहे ऐश्वर्या नारकर यांचं ब्युटी सिक्रेट? चेहऱ्यावर लावतात 'हा' पदार्थ

ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं त्या अविरतपणे मनोरंजन करत आहेत. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या ऐश्वर्या नारकर या त्यांच्या सौंदर्यांमुळे आजही चाहत्यांना भुरळ घालतात. त्यांचं सौंदर्य पाहून आजही चाहते थक्क होतात. कोणताही मेकअप न करताही त्या इतक्या सुंदर दिसतात की त्यांच्यावरुन नजरच हटत नाही. आता ऐश्वर्या यांचं ब्युटी सीक्रेट समोर आलं आहे. 

उन्हाळ्यातही ऐश्वर्या यांची त्वचा तजेलदार दिसते. कारण, ऐश्वर्या त्यांच्या त्वचेची खास काळजी घेतात. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या चेहऱ्या कोरफडीचा गर लावताना दिसत आहेत. याचे फायदेही त्यांनी सांगितले आहेत. "कोरफडीचा गरात मॉइश्चरायझिंगचे गुणधर्म असतात. उन्हापासून आलेला काळवंडपणा आणि जळजळ कमी करण्यात, जखम बरी करण्यास आणि त्वचेचं आरोग्य वाढवण्यास ते मदत करतात", असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 


ऐश्वर्या नारकर यांनी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच त्यांच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेने निरोप घेतला. त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. अनेक ट्रेंडिंग गाण्यावर त्या अविनाश नारकर यांच्यासोबत रील व्हिडिओ बनवताना दिसतात. 

Web Title: marathi actress aishwarya narkar shared her beauty secret aloe vera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.